मुख्यमंत्री करणार नंदुरबारच्या ‘मॉडेल व्हिलेज’ची पाहणी
By Admin | Updated: May 16, 2017 18:37 IST2017-05-16T18:37:14+5:302017-05-16T18:37:14+5:30
‘मॉडेल व्हिलेज’ भगदरी येथे भेट देऊन विकास कामांची पाहणी करणार आहेत़

मुख्यमंत्री करणार नंदुरबारच्या ‘मॉडेल व्हिलेज’ची पाहणी
ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. 16 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी मोलगी ता़ अक्कलकुवा येथे येत आहेत़ या दौ:यात मुख्यमंत्री फडणवीस ‘मॉडेल व्हिलेज’ भगदरी येथे भेट देऊन विकास कामांची पाहणी करणार आहेत़
मुख्यमंत्री फडणवीस हे सकाळी 10़10 वाजता हेलिकॉप्टरने मोलगी येथे येणार आहेत़ तेथून सकाळी 10़20 वाजता मोलगी ग्रामीण रूग्णालयात ‘न्यूट्रीशन रिहॅबिलिटेशन सेंटर’चे उद्घाटन करून ते वाहनाने भगदरीकडे प्रयाण करतील, 10़40 वाजेपासून भगदरी येथे जलयुक्त शिवार, घरकुल, शौचालये, रोपवाटिकांच्या कामांची पाहणी करून 11़25 ला पुन्हा मोलगी येथे येतील़ याठिकाणी 11़30 वाजेपासून मुख्यमंत्री फडणवीस जिल्ह्यातील अधिका:यांची आढावा बैठक घेणार आहेत़ बैठकीनंतर दुपारी एक वाजता ते शिंदखेडय़ाकडे रवाना होणार आहेत़
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौ:याच्या पाश्र्वभूमीवर भगदरी व मोलगी येथे विविध विकासकामे पूर्ण करण्यात आली असून अधिकारी तळ ठोकून आहेत़