शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

बळसाणेसह माळमाथामध्ये शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे ढग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 10:32 PM

ढगाळ वातावरणाचा परिणाम : उत्पादन घटण्याची शक्यता

बळसाणे : साक्री तालुक्यातील बळसाणे गावासह परिसरात रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे़ मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सततच ढगाळ आणि शुक्रवारी रात्री झालेल्या पावसामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे़ यंदाच्या वर्षी हाता तोंडाशी आलेली पीके या प्रतिकूल वातावरणामुळे जाण्याच्या धास्तीने शेतकरी वर्गात चिंतेचे ढग निर्माण झाले आहे़पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाने दांडी मारली आणि त्यानंतर झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना काही ठिकाणी दिलासा दिला तर काही ठिकाणी पिकांचे नुकसान केले मात्र शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसाने पाण्याचा प्रश्न मिटविला यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड करण्यात आली यावर्षी कांद्याला चांगला बाजारभाव मिळाल्याने बहुतांश शेतकºयांनी कांदा लागवड केली आहे़ त्याचबरोबर गहू , हरभरा , भुईमूग , टरबूज , पपई व भाजीपाला अशा पिकांना शेतकºयांनी पसंती दिली आहे़ मात्र माळमाथा परिसरात सतत ढगाळ वातावरण निर्माण होत आहे़ अशा ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे़ढगाळ वातावरण आणि थंडीची उणीव असल्याने परिणामी उत्पादनात घट होण्याची धास्ती शेतकºयांच्या मनात निर्माण झाली आहे़ सतत ढगाळ वातावरण आणि सध्या थंडीचे प्रमाण कमी असल्याने गहू पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव पहावयास मिळत आहे असे परिसरातील शेतकºयांनी सांगितल़े़पावसाने बळसाणे, दुसाने, हाट्टी, ऐचाळे, इंदवे, सतमाने, कढरे, आगरपाडा अमोदा, छावडी, लोणखेडी आदी माळमाथा भागात रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतक?्यांची तारांबळ उडाली शेतात काढून ठेवलेले पिके बैलांसाठी लागणारा चारा, भुईमूग, टरबूज, पपई पाण्याच्या बचावापासून काही तरी झाकावे या उद्देशाने शेतकºयांची धावपळ उडाली़ या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना काही प्रमाणात फटका बसला आहे़

टॅग्स :Dhuleधुळे