बळसाणेसह माळमाथामध्ये शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे ढग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 22:32 IST2021-01-10T22:32:10+5:302021-01-10T22:32:34+5:30
ढगाळ वातावरणाचा परिणाम : उत्पादन घटण्याची शक्यता

बळसाणेसह माळमाथामध्ये शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे ढग
बळसाणे : साक्री तालुक्यातील बळसाणे गावासह परिसरात रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे़ मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सततच ढगाळ आणि शुक्रवारी रात्री झालेल्या पावसामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे़ यंदाच्या वर्षी हाता तोंडाशी आलेली पीके या प्रतिकूल वातावरणामुळे जाण्याच्या धास्तीने शेतकरी वर्गात चिंतेचे ढग निर्माण झाले आहे़
पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाने दांडी मारली आणि त्यानंतर झालेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना काही ठिकाणी दिलासा दिला तर काही ठिकाणी पिकांचे नुकसान केले मात्र शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसाने पाण्याचा प्रश्न मिटविला यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड करण्यात आली यावर्षी कांद्याला चांगला बाजारभाव मिळाल्याने बहुतांश शेतकºयांनी कांदा लागवड केली आहे़ त्याचबरोबर गहू , हरभरा , भुईमूग , टरबूज , पपई व भाजीपाला अशा पिकांना शेतकºयांनी पसंती दिली आहे़ मात्र माळमाथा परिसरात सतत ढगाळ वातावरण निर्माण होत आहे़ अशा ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे़
ढगाळ वातावरण आणि थंडीची उणीव असल्याने परिणामी उत्पादनात घट होण्याची धास्ती शेतकºयांच्या मनात निर्माण झाली आहे़ सतत ढगाळ वातावरण आणि सध्या थंडीचे प्रमाण कमी असल्याने गहू पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव पहावयास मिळत आहे असे परिसरातील शेतकºयांनी सांगितल़े़
पावसाने बळसाणे, दुसाने, हाट्टी, ऐचाळे, इंदवे, सतमाने, कढरे, आगरपाडा अमोदा, छावडी, लोणखेडी आदी माळमाथा भागात रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतक?्यांची तारांबळ उडाली शेतात काढून ठेवलेले पिके बैलांसाठी लागणारा चारा, भुईमूग, टरबूज, पपई पाण्याच्या बचावापासून काही तरी झाकावे या उद्देशाने शेतकºयांची धावपळ उडाली़ या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना काही प्रमाणात फटका बसला आहे़