डोंगराळे येथील जैतोबा देऊळ बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 12:48 IST2020-03-21T12:48:30+5:302020-03-21T12:48:56+5:30
ट्रस्टचे आवाहन : नवस, मानतासाठी भाविकांनी येऊ नये

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
कुसुंबा : कुसुंबा मालेगाव रस्त्यावर असलेले आराध्य दैवत जैतोबा महाराज देवस्थान ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.
देवस्थान जागरुत असून याठिकाणी धुळे, नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद, जळगाव, नंदूरबार, सुरत, बडोदा, अहमदाबाद येथून मोठ्या संख्येन ेभाविक नवसपूर्तीसाठी येत असतात. परंतु सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले असून मोठ्या संख्येने रूग्ण आढळत आहेत. यावर खबरदारीचा उपाय म्हणून मंदिरे, देवस्थाने, सभागृह, शाळा महाविद्यालये, थिएटर, आदी बंद करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर १८ ते ३१ मार्चपर्यंत हे डोंगराळे येथील देवस्थान बंद ठेवण्यात आले आहे. भाविकांनी कोणताही नवस, मानता, जाऊळ, शेंडी वा दर्शनासाठी भाविकांनी येऊ नये असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष अशोक धोंडू म्हसदे, सचिव सुरेश गंभीर म्हसदे, कोषाध्यक्ष दयाराम जयराम म्हसदे, सहसचिव दत्तात्रय दामू म्हसदे व विश्वस्त मंडळ व सदस्य यांनी आवाहन केले आहे.