धुळे जिल्ह्यात सेंट्रल किचन पद्धत बंद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 13:36 IST2020-02-05T13:36:13+5:302020-02-05T13:36:33+5:30
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले निवेदन

धुळे जिल्ह्यात सेंट्रल किचन पद्धत बंद करा
आॅनलाइन लोकमत
धुळे :शासनाने पोषण आहारासाठी सुरू केलेली सेंट्रल किचन पध्दत बंद करावी. तसेच शाळेतील मुख्याध्यापकांकडून पोषण आहार देणाऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळावी, यासह विविधमागण्या शालेय पोेषण आहार कामगार संघटनेने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी.यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दहा ते पंधरा वर्षांपासून अल्प मानधनावर काम करीत आहोत. काम करताना कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाही. मुख्याध्यापकांकडून कामगारांवर अन्याय केला जातो. तसेच सापत्न वागणूक दिली जाते. त्यावर मुख्याध्यापकांना सूचना देऊन पोषण आहार तयार करणाºया कामगारांना सन्मानाची वागणूक द्यावी, अशी मागणी केली. तसेच इतर मागण्यांचाही सहानुभूतीने विचार करावा, असे म्हटले आहे. यासाठी जिल्हा परिषद कार्यालयाच्या बाहेर निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी सिटूचे अध्यक्ष एल.आर.राव, शालेय पोषण आहाराचे अध्यक्ष अरुणा पाटील, शरद पाटील, संतू पावरा, नरेंद्र गिरासे, वैशाली पाटील, आशा नकम, रुपाली सूर्यवंशी, उषा पाटील, सविता पावरा, विमल पाटील, रवींद्र चौधरी, मीना पाटील, निर्मला पाटील आदींसह पोषण आहाराचे काम करणाºया महिला उपस्थित होत्या.यावेळी संघटनेच्यावतीने निदर्शने करण्यात आली.