Cleanliness campaign will be implemented along the river | नदीकाठावर स्वच्छता मोहीम राबविणार 
नदीकाठावर स्वच्छता मोहीम राबविणार 

धुळे : अक्कलपाडा धरणातुन सोड्यात आलेल्या पाण्यामुळे पांझरा नदीला पुर आला आहे़ त्यामुळे नदीकाठावरील नागरीवस्तीमध्ये पाणी शिरल्याने परिसर मनपातर्फे स्वच्छता मोहिम राबविण्याच्या सुचना महापौर चंद्रकांत सोनार यांनी केले़ 
 पुरपरिस्थतीमुळे नदी काठा लगतच्या नागरी वस्ती पाणी शिरले आहे़ सद्यस्थितीतील पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता़ साथीचे आजार होऊ नये यासाठी नदीकाठालगतच्या दोन्ही भागात व्यापक  स्वरूपात स्वच्छता मोहीम १६ आॅगस्टपासुन राबविण्यात येणार आहे़ या मोहिमेत मनपाच्या अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, वाहने, मशीनरीची मदत घेतली जाणार आहे़  १६ रोजी सिध्देश्वर गणपती मंदिराजवळ  साकळी ७ वाजता  सामाजिक बांधिलकी म्हणुन सर्व नगरसेवक, संघटना, संस्था, स्वच्छता प्रेमी नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत श्रमदान करून योगदान द्याव, असे आवाहन महापौर सोनार यांनी केले आहे़  

Web Title: Cleanliness campaign will be implemented along the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.