घरकुल लाभार्थ्यांच्या अनुदानाची रक्कम वर्ग करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 23:16 IST2019-07-24T23:14:08+5:302019-07-24T23:16:16+5:30
पालक दादा भुसे : जिल्हा नियोजन समिती बैठकीत निर्देश

घरकुल लाभार्थ्यांच्या अनुदानाची रक्कम वर्ग करा
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी १९ हजार घरकुले मंजूर झाली आहेत. पात्र लाभार्थ्यांना घरकूल मंजुरीचे पत्र व पहिला हप्ता १५ आॅगस्टपर्यंत वितरीत करावा, असे निर्देशे जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात बुधवारी सकाळी जिल्हा नियोजन समितीची बैठकीत मंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. हीना गावित, जिल्हाधिकारी गंगाथरण डी., मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर आदी उपस्थित होते.
जिल्हा वार्षिक योजनेत २०१९-२०२० या वषार्साठी सर्वसाधारणसाठी १४७ कोटी रुपये, विशेष घटक योजनेत २९ कोटी रुपयांचा, तर आदिवासी उपयोजनेत १२२ कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर आहे. त्याचे नियोजन संबंधित विभागांनी करावे. तसेच शेतकºयांच्या बचत खाते क्रमांकाची पडताळणी करुन प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, बोंडअळी नुकसान भरपाई, दुष्काळ अनुदान पात्र शेतकºयांच्या बचत खात्यात तत्काळ जमा करावे. पीक कर्ज, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या लाभासाठी मेळाव्यांचे आयोजन करावे असे मंत्री भुसे यांनी सांगितले़
यावेळी डॉ. गावित, डॉ. जितेंद्र ठाकूर, नारायण पाटील, बापू खलाणे, धीरज पाटील, छोटू पाटील, विशाल देसले, हिरामण गवळी आदींनी भाग घेत विविध विषय मांडले. जिल्हा नियोजन अधिकारी वाडेकर यांनी आभार मानले.
पीक विम्यास २९ जुुलैपर्यंत मुदतवाढ
जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती पाहता नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. चाºयाचे नियोजन करावे, असे सांगत खरीप हंगाम २०१९ मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सर्व कर्जदार व बिगर कर्जदार शेतकºयांनी सहभागी होता यावे म्हणून २९ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे