शहर पोलिसांनी पकडले दोघा दुचाकी चोरांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:39 IST2021-08-27T04:39:29+5:302021-08-27T04:39:29+5:30
धुळे शहरातील दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांना आळा आणि प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव ...

शहर पोलिसांनी पकडले दोघा दुचाकी चोरांना
धुळे शहरातील दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांना आळा आणि प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना तपासणीसाठी आदेशित केले होते. त्या अनुषंगाने देशमुख आणि त्यांच्या शोध पथकाने शासकीय कार्यालय आणि गर्दीच्या ठिकाणी गस्त घालणे सुरू केले हाेते. गोपनीय माहितीच्या आधारे शोध पथकाने बबलू सुरेश मराठे (२९, रा. जयशंकर काॅलनी, वाडीभोकर रोड, देवपूर धुळे) आणि कलीम शेख अकिल शेख (२४, रा. तिरंगा चौक, धुळे) या दोघांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यांनी दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ६० हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत.
ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी मुक्तार मन्सुरी, पंकज खैरमोडे, राहुल पाटील, नीलेश पोतदार, मनीष सोनगिरे, प्रवीण पाटील, शाकीर शेख, गुणवंत पाटील, प्रसाद वाघ, सचिन पगारे यांच्या पथकाने केली.