शहरात १२ वाहनांद्वारे घातली जाते गस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:40 IST2021-01-16T04:40:07+5:302021-01-16T04:40:07+5:30
शहरातील तालुका पोलीस ठाणे वगळता उर्वरित सहा पोलीस ठाण्यांतून पोलिसांची गस्त घातली जात आहे. तालुका पाेलिसांचीही ग्रामीण भागात गस्त ...

शहरात १२ वाहनांद्वारे घातली जाते गस्त
शहरातील तालुका पोलीस ठाणे वगळता उर्वरित सहा पोलीस ठाण्यांतून पोलिसांची गस्त घातली जात आहे. तालुका पाेलिसांचीही ग्रामीण भागात गस्त घालण्याचे काम सुरू आहे. आवश्यकता भासेल, त्यावेळेस अपर पोलीस अधीक्षक यांच्याकडूनही काही वेळेस अचानक गस्त घातली जाते. याशिवाय त्या-त्या पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारी रात्र व दिवसांच्या गस्तीच्या कामांत सहभागी होत असतात. स्थानिक पोलिसांना आवश्यक त्या वेळेस सूचनाही दिल्या जातात.
घरफोडीच्या उद्देशाने फिरणारे झाले होते गजाआड
गेल्याच आठवड्यात नागपूर-सूरत राष्ट्रीय महामार्गावरील चक्करबर्डी परिसरात रात्रीच्या गस्तीवरील पोलिसांनी दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरणाऱ्यांना पकडले. त्यातील एक जण पोलिसांच्या जाळ्यात सापडला. मात्र, बाकीचे पळून गेले. तपास सुरू आहे.
गस्तीवरील कर्मचारींचा रोज घेतला जातोय आढावा
दिवसा आणि रात्रीच्या वेळेस दुचाकीसह चारचाकी वाहनांच्या माध्यमातून गस्ती घातली जाते. कोणते कर्मचारी हे कोणत्या वाहनांतून गस्त घालत आहेत, कोणत्या ठिकाणी ते फिरत आहेत, याचा आढावा हा पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारी यांच्याकडून घेतला जातो.
तरीही चैन स्नॅचिंग घटना घडताय, वचक कुठे
गस्तीवरील कर्मचारी यांच्या माध्यमातून लक्ष ठेवण्याचे काम ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली असली, तरी चोऱ्या, घरफोडीच्या घटना थांबलेल्या नाहीत. ही बाबही पोलिसांनी गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे.
चोरट्यांवर वचक बसवा
पोलिसांकडून गस्त घालणे आणि घडणाऱ्या घटना कमी अथवा घडणारच नाही, अशी अपेक्षा आहे. मात्र, तसे होताना काही ठिकाणी दिसत नाही. पोलिसांनी प्रामाणिकपणे गस्त घालून चोरट्यांवर वचक निर्माण करायला हवा.