नागरिकता संशोधन कायदा रद्द करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 23:22 IST2019-12-18T23:21:34+5:302019-12-18T23:22:02+5:30
धरणे आंदोलन : अल्पसंख्यांक नागरी हक्क संघर्ष समितीची जिल्हा प्रशासनाकडे मागणी

Dhule
धुळे : केंद्र सरकारने संविधानातील मुलभूत हक्क असलेल्या समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन करीत नागरिकत्व संशोधन कायदा व एनआरसी प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीसाठी अल्पसंख्याक नागरी हक्क समितीतर्फे बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
भारतीय संविधानाने समानतेचा अधिकार दिलेला असतांनाच केंद्र सरकार सत्तेच्या जोरावर संविधानाच्या आराखळ्यालाच धक्का लावण्याचा प्रयत्न करीत आहे़ एका धर्माच्या नागरिकांना लक्ष करून नागरिकता संशोधन कायदा व एनआरसी प्रक्रिया राबविली जाणारी जात आहे़ ती तत्काळ रद्द करावी, संसदेत उभे राहून देशाला खोटी व दिशाभूल करणारी माहिती देणाऱ्या गृहमंत्री अमित शहा यांनी तत्काळ राजीनामा द्यावा़ तसेच जमिया विद्यापीठात विद्यार्थ्यांवर आंदोलनादरम्यान पोलीसांकडून झालेल्या अत्याचाराविरूध्द गुन्हे दाखल करून पोलिसांना निलंबीत करावे, १८ डिसेबर हा महाराष्ट्रात अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून राबविला जातो़ यानिमित्ताने राज्यात अल्पसंख्याक समाजाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात़ अशा विविध मागण्यासाठी क्यूमाईन क्लब येथे अल्पसंख्याक नागरी हक्क संघर्ष समितीच्यावतीने धरणे आंदोनल करण्यात आले़ यावेळी अॅड़ जुबेर शेख, मुनाफ शेख, महेमुद्द मन्सुरी, मोहम्मद आमीर मोहम्मद, गफ्फार अन्सारी, सईद बेग, जाहिद हूसेन अन्सारी उपस्थित होते़