खंडीत वीजपुरवठ्याने नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:11 IST2019-07-30T12:11:18+5:302019-07-30T12:11:41+5:30

मुख्य वीज वाहिन्या आठवड्यात तीन वेळा तुटल्या : स्वस्तधान्य दुकानांपासून बँकांपर्यंतची कामे ठप्प

Citizens are frustrated by the disrupted electricity supply | खंडीत वीजपुरवठ्याने नागरिक हैराण

वीजेअभावी मालपूर येथील एकविरा देवी स्वस्तधान्य दुकानावर ताटकळत बसलेले लाभार्थी.

मालपूर : शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे विद्युत वीज उपकेंद्र असून देखील विजेचा लपंडाव होतो. सुराय चौफुलीवर आठवड्यातून तीनदा मुख्य वाहिनीच्या तारा तुटल्या. भरदिवसा तारा तुटत असल्यामुळे जीवीत हानी होण्याचा गंभीर धोका उद्भवू शकतो. तर विजे अभावी स्वस्तधान्य दुकानापासून ते बँकेच्या शाखेपर्यंत विविध कामांसाठी नागरिक ताटकळत असतात. याबाबत वरिष्ठांनी योग्य दखल घ्यावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.
मालपूर येथे अमरावती मध्यम प्रकल्पात ३३/११ केव्ही क्षमतेचे विद्युत विज उपकेंद्र असून स्वतंत्र तीन फिडर आहेत. मात्र हे ‘केंद्र कुचकामी आहे की कर्मचारी’ हा सध्या शोधाचा विषय परसरात बोलला जात आहे. 
पाऊस असो किंवा नसो वीज पुरवठा सतत खंडीत होतो. गावात वीज उपकेंद्र असून काय उपयोगाचे अशी नागरिकांमध्ये चर्चा होते.
सुराय रस्ता चौफुली येथे नेहमी वर्दळ असते. सुराय, चुडाणे, अक्कलकोस व कर्ले, परसोळे, साक्रीकडे जाणारे प्रवासी तसेच जवळच माध्यमिक शाळा असून या शाळेच्या पटांगणाजवळू गेलेल्या सुराय रस्ता चौफुलीवरच्या मुख्य वीज वाहिनीच्या तारा या आठवड्यात तीन वेळा तुटल्या. भरदिवसा या तारा तुटत असून जीवीत हानी होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
वीज पुरवठा खंडीत होताच येथील सेंट्रल बँकेची कनेक्टीव्हीटी सुद्धा खंडीत होते. तसेच सरकार मान्य स्वस्तधान्य दुकानावरील इलेक्ट्रॉनिक वजन काटा बंद पडून अक्षरश: धान्य दुकानापासून ते बँकेच्या शाखेपर्यंत नागरिक ताटकळतांना दिसून येतात. वेळेवर काम होत नसल्यामुळे ग्रामस्थ हैराण असून कंपनीच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याची दखल घ्यावी अशी मालपूर ग्रामस्थांची मागणी  आहे.

Web Title: Citizens are frustrated by the disrupted electricity supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे