तापी नदी काठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:42 IST2021-09-04T04:42:55+5:302021-09-04T04:42:55+5:30

हातनूर धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता असल्याने पाण्याचा येवा लक्षात घेता प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग ...

Citizens along the Tapi River should be vigilant | तापी नदी काठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी

तापी नदी काठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी

हातनूर धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता असल्याने पाण्याचा येवा लक्षात घेता प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येईल. त्यामुळे तापी नदीपात्रात पाणीपातळी वाढणार असल्याने धुळे जिल्ह्यातील तापी नदीकाठच्या गावांमधील ग्रामस्थांनी तापी नदीपात्रामध्ये गुरे-ढोरे सोडू नयेत, अथवा नदीकाठाजवळ जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावेत. नदीपात्रात मासेमारी करण्यासाठी अथवा कुठल्याही कारणास्तव जाऊ नये. याबाबत तापी नदीकाठावरील गावांमध्ये जनजागृती करीत सतर्क करावे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी गायकवाड यांनी तहसीलदार, शिरपूर, शिंदखेडा, अपर तहसीलदार दोंडाईचा, गटविकास अधिकारी, शिरपूर, शिंदखेडा, पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, शिंदखेडा, दोंडाईचा, शिरपूर यांना दिले आहेत. तसेच ग्रामसेवक, तलाठी, मंडळाधिकाऱ्यांनी दर दोन तासांनी तालुका नियंत्रण कक्षात व तालुका नियंत्रण कक्षांनी दर दोन तासांत जिल्हा नियंत्रण कक्षात अद्ययावत माहिती कळवावी, तसेच मुख्यालय सोडू नये, असेही नमूद करण्यात आले.

Web Title: Citizens along the Tapi River should be vigilant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.