लोकमत न्यूज नेटवर्कनिजामपूर : भारतीय सीमेवरील गवलान खोऱ्यात चिनी सैनिकांनी केलेल्या हल्यात २० भारतीय जवान शहीद झाले. या शहीद जवानांना निजामपूर ग्रामस्थांनी गुरुवारी सायंकाळी आदरांजली अर्पण करण्यात आली. तसेच या हल्याचा निषेध करण्यात येऊन चीनचा झेंडा जाळण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी भारत माता की जय च्या घोषणा दिल्यात.निजामपूर गावात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सेल्फ लॉकडाऊन ही संकल्पना राबवित आहे. दररोज निजामपूर गावातील व्यापारी दुपारी एक वाजेनंतर आपले व्यवसाय बंद ठेऊन कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रयत्न करीत आहे. गुरुवारी सुद्धा गावातील व्यापाऱ्यांनी आपले सर्व व्यवसाय दुपारी एक वाजता बंद केले. त्यांतर भारतीय सीमेवरील गवलान खोºया चिनी सैनिकांनी केलेल्या हल्यात शहीद २० भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला त्यानुसार सायंकाळी सर्व ग्रामस्थ आझाद चौकात एकत्रित झाले.चीनच्या सैनिकांनी केलेल्या हिंसक चकमकीत शहीद झालेल्या भारतीय जवानांना आझाद चौकात श्रद्धांजली वाहण्यात आली. निजामपूर ग्रामस्थांनी श्रद्धांजली वाहिल्यानंतर भगवान जगदाळे यांनी स्थिती विषयी विचार मांडले.त्यानंतर संतप्त नागरिकांनी‘भारत माता की जय’ च्या देश भक्ती पर घोषणा देत चीनचा लाल झेंडा जाळला.आझाद चौकात सरपंच सलीम पठाण यांनी चीनच्या लाल झेंडा जाळला.यावेळी माजी सरपंच अजितभाई शाह, युसूफ सैय्यद, भैय्या गुरव, महेंद्र वाणी, त्रिलोक दवे, संजय शाह, तेजस जयस्वाल, प्रवीण शाह ,तुषार सोनार, शामभाई शाह ,भूषण सूर्यवंशी, विक्की सूर्यवंशी, जगदीश जाधव असे अनेक नागरिक यावेळी उपस्थित होते.
चीनचा झेंडा जाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 13:14 IST