शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

चिंचवार येथे मारहाणीनंतर मुलीची आत्महत्या, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 12:10 PM

संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी, काहीवेळ निर्माण झाला तणाव

ठळक मुद्देमहिलांनी मारहाण केल्याने मुलीने आत्महत्या केल्याचा आरोपसंबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीपोलिसांच्या आश्वासनानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : तालुक्यातील चिंंचवार येथे १४ वर्षीय मुलीचा विहिरीत बुडून मृत्यू झाला असून गावातील महिलांनी मारहाण केल्यामुळेच तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला. संबंधितांवर गुन्हे दाखल केले जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता.मात्र चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन सोनगीर पोलिसांनी दिले. त्यामुळे सुमारे ४८ तासानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. ज्योती निंबा पाटील (१४) रा.चिंचवार असे मृत मुलीचे नाव असून तिचा मृतदेह मंगळवारी दुपारी तिच्याच शेतातील विहिरीत आढळला होता. त्या प्रकरणी सोनगीर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. ज्योतीचा मृत्यू अकस्मात नसून तिने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांचा आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार दोन दिवसापूर्वी ज्योती व गावातील मुलींचे भांडण झाले होते. त्यातून काही महिलांनी ज्योतीला मारहाण केली. त्यांच्या तावडीतून आईने ज्योतीची सोडवणूक केली. मात्र भेदरलेल्या ज्योतीने शेतात जाऊन तेथील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मृतदेह घेतला ताब्यात त्यामुळे जोपर्यंत संबंधितांवर गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत ज्योतीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका धनगर समाजाचे नेते अण्णा सूर्यवंशी आणि नातेवाईकांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र सोनगीर पोलिसांनी चौकशीअंती दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन ज्योतीच्या नातेवाईकांना  दिले. त्यामुळे ज्योतीचा मृतदेह ताब्यात घेऊन दुपारी उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले.