बालकुमारांच्या कलागुणांनी श्रोते मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 12:09 IST2020-03-09T12:09:24+5:302020-03-09T12:09:50+5:30

राज्यस्तरीय संमेलन : शुभम मराठी बाल, कुमार, युवा व नवोदित साहित्य संमेलन उत्साहात, पुढील संमेलन गोव्यात होणार लोकमत न्यूज ...

Children's talents captivate the audience | बालकुमारांच्या कलागुणांनी श्रोते मंत्रमुग्ध

dhule


राज्यस्तरीय संमेलन : शुभम मराठी बाल, कुमार, युवा व नवोदित साहित्य संमेलन उत्साहात, पुढील संमेलन गोव्यात होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : अकोला येथील शुभम मराठी साहित्य मंडळाच्यावतीने आयोजित नवव्या राज्यस्तरीय शुभम मराठी बाल, कुमार, युवा व नवोदित साहित्य संमेलन रविवारी धुळे येथे कोतवाल सभागृहात उत्साहात पार पडले़ बालकुमार साहित्यिकांनी सादर केलेल्या कलागुणांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले़ दहावे साहित्य संमेलन गोव्यात होणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली़
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी नाशिक येथील साहित्यिक व अभिनेते तुषार बैसाणे होते़ साक्रीच्या आमदार मंजुळा गावीत यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले़ यावेळी सेवानिवृत्त विभागीय आयुक्त रवींद्र जाधव, अकोल्याचे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ एस़ एस़ सोसे, नाशिक येथील गायिका व अभिनेत्री प्रांजली बिरारी, स्वागताध्यक्ष आगामी ‘एक ती’ चित्रपटाचे निर्माते सचिन अवसरमल, नंदुरबारच्या वन परीक्षेत्र अधिकारी स्रेहल अवसरमल, आठव्या संमेलनाचे अध्यक्ष अशोक शिरसाट, कवी जगदीश देवपूरकर, ज्येष्ठ नाटककार सुभाष अहिरे, पोलिस निरीक्षक राजकुमार उपासे, आदी मान्यवर उपस्थित होते़
रविवारी सकाळी दहाला संमेलनाचे उद्घाटन झाले़ विदर्भातून सुरू झालेली बालकलाकांराची ही चळवळ आता संपूर्ण राज्यात बालकुमार साहित्यिकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध करुन देत आहे़ त्यामुळे मराठी साहित्य संमेलनाप्रमाणेच बालकुमारांच्या साहित्य संमेलनाला देखील शासनाची आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन आमदार मंजुळा गावीत यांनी दिले़
संमेलनाचे अध्यक्ष तुषार बैसाणे म्हणाले की, ३३ व्या वर्षी एखाद्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळणे ही खरोखर अभिमानाची बाब आहे़ त्यामुळे साहित्य आणि चित्रपट क्षेत्रात काम करताना जबाबदारी वाढली आहे़ बालक आणि युवक साहित्यिक, कलाकारांनी सतत क्रियाशिल राहिले पाहिजे, असे मार्गदर्शन त्यांनी केले़
या संमेलनात शिरपूरचे प्रा़ फुला बागुल, बीडचे डॉ़ सतीश म्हस्के यांना एस़ एस़ सोसे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले़ तसेच डॉ़ विजया वाड, मनिषा कदम, शिल्पा खेर मुंबई (सुवर्णकण), कुणा नामदेवाची चित्तरकथा कादंबरी गिरीजा कीर मुंबई, बाप नावाची माय जीवन चरित्र डॉ़ राजेश गायकवाड, तेलगंणा, जीगरबाज गोट्या बालसाहित्य डॉ़ श्रीकांत पाटील, कोल्हापूर आणि आयुष्य एक न उलगडणारं कोडं गीता लव्हाळे यांना आनंदी साहित्य पुरस्कारांचे वितरण करण्यात आले़
शुभम साहित्यिक कलावंतांचा देखील यावेळी सन्मान झाला़ त्यात धुळ्याच्या स्रेहल अवसरमल पर्यावरण, यवतमाळचे संजय हातगावकर प्रशासन, डॉ़ सुरेखा बरलोटा वैद्यकीय, अकोला येथील रुबेन वाकळे पत्रकारिता, नागपूरच्या धनश्री लकुरवाळे क्रिडा, अमरवतीचे प्रा़ योगेश बोडे संगीत, मुंबईच्या लता गुठे प्रकाशन, बोरगाव येथील रा़ वा़ वानखेडे शिक्षण आणि पुणे येथील शांताराम वाघ सामाजिक क्षेत्र यांचा सन्मान करण्यात आला़
‘उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी युवक व युवतींची भूमिका’ या विषयावर परिसंवाद झाला़ अध्यक्षस्थानी नाशिकचे चिंतामण शिरोळे होते़ अकोला येथील राजेश भिसे प्रमुख वक्ते होते़ शशिकांत हिंगोणेकर जळगाव, डॉ़ शिवानंद भानुसे औरंगाबाद, डॉ़ श्रीकांत पाटील कोल्हापूर, मनिषा घेवडे मुंबई आदींनी सहभाग घेतला़ मुक्ताईनगरचे सुरेश बोरसे यांनी सूत्रसंचालन केले़ अमिता जळगावकर यांनी आभार मानले़ त्यानंतर औरंगाबादचे डॉ़ सुभाष बागुल यांचे कथाकथन झाले़ अध्यक्षस्थानी प्रा़ डॉ़ फुला बागुल होते़ चोपड्याचे भास्कर पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर वाडेगावचे गिरी गुरूजी यांनी आभार मानले़
कवी संमेलनात प्रमोद आवटे जयवंत बोदडे मुक्ताईनगर, भास्कर पाटील चोपडा, राजेश पोतदार भुसावळ, डॉ़ सुशिल सातपुते गातेगाव, श्रध्दा भिडे मुंबई, प्रा़ चेतन अमोदकर भुसावळ, प्रा़ अरविंद भामरे शिरपूर, मिलिंद ढोढरे शहादा, भगवान निंबाळकर बोराडी, प्रकाश साखरे इचलकरंजी, दीपक तोडकर कोल्हापूर, संभाजी चौगुले पन्हाळा, राहूल पाटील मिरज, सचिन कुसणाडे सांगली, रघुनाथ कापसे आदींनी सहभाग घेतला़ कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी नाशिकच्या प्रा़ सुमती पवार होत्या़ शुभांगी पाटील यांनी सूत्रसंचालन केले़ जळगावचे अ‍ॅड़ विलास मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती़संमेलनाच्या यशस्वीतेसाठी शुभम मराठी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आतिश सुरेश सोसे, उपाध्यक्ष प्रशांत मानकर, कार्याध्यक्ष डॉ़ विनोद उबाळकर, सचिव प्रा़ दिपाली आतिश सोसे, सल्लागार बाळासाहेब ठाकरे, संजय वानेरे, संदिप फासे, दिनेश छबिले, उमेश राठोड, अ‍ॅड़ अमिता जळगावकर, गीता लवाळे, कल्पना देशमुख, पद्मश्री हातगावकर, स्वप्नील कुलकर्णी, तेजश्री मानकर, प्रा़ विजयराव देशपांडे आदींनी परिश्रम घेतले़

Web Title: Children's talents captivate the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे