बाल कल्याण समिती झाली ११५ अनाथांची नाथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:41 IST2021-09-15T04:41:38+5:302021-09-15T04:41:38+5:30
कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना तत्काळ मदत करणे व अशा अनाथ मुलांच्या पाठीशी उभे राहणे हे समाजातील सर्व घटकांचे आद्यकर्तव्य ...

बाल कल्याण समिती झाली ११५ अनाथांची नाथ
कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना तत्काळ मदत करणे व अशा अनाथ मुलांच्या पाठीशी उभे राहणे हे समाजातील सर्व घटकांचे आद्यकर्तव्य आहे. प्रशासनाच्या मदतीने व दानशूर व्यक्तींच्या मदतीने अशा बालकांना सांभाळणाऱ्या कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे समितीतर्फे वाटप करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. सुदाम राठोड यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना विनंती केली की, किमान तालुक्यातील अशा संकटकाळात सापडलेल्या कुटुंबीयांचे विविध प्रकारचे टॅक्स माफ केले जावे व बालकल्याण समिती अशा कुटुंबीयांच्या पाठीमागे सदैव राहील, असे आश्वासित केले.
गटविकास अधिकारी जे. टी. सूर्यवंशी यांनी अशा गावातील कुटुंबीयांच्या बाबतीमध्ये संबंधित ग्रामसेवकाकडून ठराव मागवण्यात येईल व टॅक्स माफीची पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही आश्वासित केले. याप्रसंगी आमदार गावित यांच्यासह नायब तहसीलदार गोपाळ पाटील, बाल संरक्षण अधिकारी योगेश धनगर, संदीप मोरे, पंचायत समिती सभापती प्रतिभा सूर्यवंशी, उपसभापती ॲड. नरेंद्र मराठे ,साक्री शहराचे पीआय आहेर, तालुक्यातील सर्व सीडीपीओ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तडवी, डॉ. गोविल व पीडित बालकांचे सांभाळ करणारे कुटुंबीय याप्रसंगी उपस्थित होते.