शरद पाटील यांना छत्रपती संभाजी राजे गौरव पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 22:30 IST2019-11-29T22:30:01+5:302019-11-29T22:30:33+5:30
३० रोजी होणार समारंभपुर्वक प्रदान

शरद पाटील यांना छत्रपती संभाजी राजे गौरव पुरस्कार
धुळे : संभाजी ब्रिगेडतर्फे दिला जाणारा छत्रपती संभाजी राजे गौरव पुरस्कार शिंदखेडा तालुक्यातील सारवे येथील सरपंच, गटनेते, दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य शरद पंडीतराव पाटील यांना जाहीर झाला आहे़
धुळे येथे नदी किनारी सिध्देश्वर हॉस्पिटलजवळ असलेल्या मराठा सेवा संघाच्या कार्यालयात ३० नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता होणाºया जाहीर समारंभात पुरस्कार प्रदान करुन त्यांना सपत्नीक गौरविण्यात येणार आहे़ शरद पाटील यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे़
पाटील हे राजकारणात असलेतरी त्यांना सामाजिक कार्यात अधिक रुची आहे़ पाणी फाऊंडेशनतर्फे झालेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत शिंदखेडा तालुक्यातून सारवे गावाला प्रथम पारीतोषिक मिळवून देण्यात शरद पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे़ सारवे परिसरात गावकºयांच्या मदतीने केलेल्या सिंचनाच्या कामांमुळे परिसराचा कायापालट झाला आहे़ त्यांच्या या उल्लेखनीय समाज कार्यामुळेच त्यांना ‘लोकमत’ने पॉलिटिकल आयकॉन या पुरस्काराने गौरविले होते़