कुरखळी येथे त्या परिवाराला प्रत्येकी ४ लाखांचा धनादेश वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:41 IST2021-08-12T04:41:14+5:302021-08-12T04:41:14+5:30
६ रोजी येथील तहसील कार्यालयात कुरखळी येथे वीज पडून आकस्मित मृत्यू झालेल्या २ परिवारांना प्रत्येकी ४ लाखांचा धनादेश आमदार ...

कुरखळी येथे त्या परिवाराला प्रत्येकी ४ लाखांचा धनादेश वाटप
६ रोजी येथील तहसील कार्यालयात कुरखळी येथे वीज पडून आकस्मित मृत्यू झालेल्या २ परिवारांना प्रत्येकी ४ लाखांचा धनादेश आमदार काशीराम पावरा, धुळे जि. प. अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, तहसीलदार आबा महाजन यांच्या उपस्थितीत मयताचे वारसदार मनीषा मनोज कोळी व मायाबाई सुनील भील यांना देण्यात आला़ तसेच या घटनेत गंभीर दुखापत झालेल्या दोघांनाही अर्थसाहाय्य मिळण्यासाठी प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. यावेळी मंडळ अधिकारी प्रशांत ढोले, अवधूत मोरे आदी उपस्थित होते़
१० जुलै रोजी दुपारी कुरखळी परिसरात शेतात काम करण्यासाठी गेलेले मनोज सुकलाल कोळी (२५), सुनील सुदाम भील (३०), समाधान बारकू भील (३०) व रवींद्र गुलाब भील (३२) चौघे राहणार कुरखळी ता. शिरपूर हे घराकडे जात असताना अचानक पाऊस सुरू झाल्यामुळे ते गावाजवळील शेतातील एका लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. त्यावेळी झाडावर वीज पडल्यामुळे मनोज सुकलाल कोळी (२५) व सुनील सुदाम भील (३०) या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर समाधान बारकू भील (३०) व रवींद्र गुलाब भील (३२) हे दोघे गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, जखमींवर अद्याप उपचार सुरू आहेत. गेल्या ९ जूनला देखील ताजपुरी येथे शेतात काम करणारे ५५ वर्षीय गोपीचंद सुकलाल सनेर या शेतकऱ्याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला होता़