धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी दोघांविरुध्द गुन्हा दाखल, तरुण मुला-मुलीचा व्हिडीओ केला होता व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:34 IST2021-09-13T04:34:33+5:302021-09-13T04:34:33+5:30
धुळे : तरुण मुला-मुलीचा व्हिडीओ व्हाॅट्सॲपवर व्हायरल करुन धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी दोन तरुणांविरुध्द धुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी दोघांविरुध्द गुन्हा दाखल, तरुण मुला-मुलीचा व्हिडीओ केला होता व्हायरल
धुळे : तरुण मुला-मुलीचा व्हिडीओ व्हाॅट्सॲपवर व्हायरल करुन धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी दोन तरुणांविरुध्द धुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. धुळे शहरात पांझरा नदीकिनारी छत्रपती संभाजी उद्यानात शुक्रवारी सायंकाळी ४.३० ते ५ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. वैभव विशाल जगताप आणि एक मुलगी उद्यानात गप्पा मारत असताना मोबाईलद्वारे त्यांचे व्हिडीओ चित्रीकरण केले गेले. हा व्हिडीओ अन्य मोबाईलवरदेखील व्हायरल केला गेला. त्याद्वारे भावना भडकवून दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, शहरातील वातावरण खराब होईल, अशा भावना उत्तेजित करणारा व्हिडीओ जाणीपूर्वक पूर्वग्रहदूषित बुध्दीने व्हाॅट्सॲपवर व्हायरल करण्यात आला. आकीब शहा सादीक शहा आणि सुफीयान अन्सारी मोहम्मद इदरिस (दोघे रा. हाजीनगर, वडजाई रोड, धुळे) या दोघांनी हे कृत्य केल्याचे समोर आले.
याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्याचे गोपनीय विभागाचे पोलीस नाईक संदीप आनंदराव अहिरे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार दोन्ही तरुणांविरुध्द देवपूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम १५३ अ, २९५ अ, ५०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एन. बेंद्रे करत आहेत.