यश संपादनासाठी बदल स्वीकारणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:43 IST2021-09-08T04:43:23+5:302021-09-08T04:43:23+5:30

शहरातील जयहिंद शैक्षणिक संस्था संचालित झेड.बी. पाटील महाविद्यालयात प्राचार्य डॉ. पी.एच. पवार यांच्या हस्ते रसायनशास्त्र मंडळाचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात ...

Changes must be accepted for successful editing | यश संपादनासाठी बदल स्वीकारणे आवश्यक

यश संपादनासाठी बदल स्वीकारणे आवश्यक

शहरातील जयहिंद शैक्षणिक संस्था संचालित झेड.बी. पाटील महाविद्यालयात प्राचार्य डॉ. पी.एच. पवार यांच्या हस्ते रसायनशास्त्र मंडळाचे ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले, तसेच शिक्षक दिवसानिमित्त मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी प्राचार्य डॉ. पवार बोलत होते. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. व्ही.एस. पवार, विभागप्रमुख तथा रसायनशास्त्र मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. व्ही.टी. पाटील, सचिव प्रा.डॉ. पी.एस. गिरासे, मंडळाचे सदस्य प्रा.डॉ. व्ही.बी. जाधव, प्रा.डॉ. एस.एल. सोनवणे, प्रा.डॉ. एस.एस. पाडवी, प्रा. एस.एस. डंबीर, प्रा. मृणाल मोरे आदी उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. पवार पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षकांबद्दल विशेष आदर असला पाहिजे. परिस्थितीतून प्रत्येकाने शिकले पाहिजे. स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी संधी मिळाल्यावर प्रत्येकाने आपले विचार मांडण्यासाठी पुढे आले पाहिजे. विद्यार्थ्यांची झालेली प्रगती शिक्षकांसाठी सर्वांत मोठा सन्मान व समाधान आहे. प्रत्येकाने चांगले आत्मचरित्र वाचले पाहिजे.

उपप्राचार्य व्ही.एस. पवार म्हणाले की, आयुष्यात चांगली शिकवण देणारा प्रत्येक व्यक्ती आपला गुरूच असतो. सत्य व प्रामाणिकपणा हे आपल्या जीवनातील दोन पैलू असून, विद्यार्थ्यांनी यश संपादन करण्यासाठी नेहमीच त्यांचे आचरण केले पाहिजे.

डॉ. व्ही.टी. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक सचिव डॉ. पी.एस. गिरासे यांनी केले. सूत्रसंचालन रोहिणी पाटील हिने केले, तर उपस्थितांचे आभार हर्षदा कुलकर्णी हिने मानले. यावेळी निखिल बोरसे, कामिनी पाटील, मयूर पाटील, तुषार पाटील, हर्षदा खैरनार यांनी गुरुजनांबद्दल कृतज्ञतापूर्वक मनोगत व्यक्त केले.

Web Title: Changes must be accepted for successful editing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.