भूमिगत गटारीचे चेंबर रस्त्यापेक्षा उंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:44 IST2021-02-05T08:44:15+5:302021-02-05T08:44:15+5:30

दुभाजकांना रंग देण्याचे काम सुरू धुळे : शहरात देवपूर भागात नेहरू चौक ते नगावबारी रस्त्याच्या दुभाजकांना रंग देण्याचे काम ...

The chamber of the underground gutter is higher than the road | भूमिगत गटारीचे चेंबर रस्त्यापेक्षा उंच

भूमिगत गटारीचे चेंबर रस्त्यापेक्षा उंच

दुभाजकांना रंग देण्याचे काम सुरू

धुळे : शहरात देवपूर भागात नेहरू चौक ते नगावबारी रस्त्याच्या दुभाजकांना रंग देण्याचे काम सुरू आहे. याच रस्त्यावर भूमिगत गटारीचे काम सुरू आहे. एकूणच एकीकडे भूमिगत गटारीसाठी रस्त्याचे खोदकाम सुरू आहे. यामुळे माती उडून दुभाजकाचे रंग पुन्हा खराब होऊ शकते. त्यामुळे भूमिगत गटारीचे काम झाल्यानंतर जेव्हा रस्त्याचे डांबरीकरण होईल. त्यानंतर जर दुभाजकाला रंग देण्याचे काम केले तर ते चांगले होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा आहे.

मिल परिसरात व्हायफाय सुरू करावी

धुळे : शहरातील देवपूर, साक्रीरोड, अग्रवाल नगर भागात बीएसएनएल आणि कंपनीचे टाॅवर आणि केबल असल्यामुळे या भागात व्हायफाय सेवा सुरू आहे. त्यामुळे या भागातील लोकांना मोबाइल आणि इंटरनेट सर्व्हिस चांगली मिळते; मात्र शहरात मिल परिसर, शासकीय दूध डेअरी परिसर, भाईजी नगर या भागात बीएसएनएल आणि अन्य खासगी कंपनीची केबल गेली नसल्यामुळे या भागात मोबाइल सेवा विस्कळीत आहे, तसेच इंटरनेट व्हायफाय कनेक्शनसुद्धा मिळत नसल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Web Title: The chamber of the underground gutter is higher than the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.