सीईओ शुभम गुप्ता यांची शिक्षण विभागात 'सरप्राईज व्हिजिट'

By अतुल जोशी | Updated: August 22, 2023 19:37 IST2023-08-22T19:36:16+5:302023-08-22T19:37:20+5:30

गुप्ता यांनी काही कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधत कामकाजाचा आढावाही घेतला.

CEO Shubham Gupta's 'Surprise Visit' to Education Department | सीईओ शुभम गुप्ता यांची शिक्षण विभागात 'सरप्राईज व्हिजिट'

सीईओ शुभम गुप्ता यांची शिक्षण विभागात 'सरप्राईज व्हिजिट'

धुळे - जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  शुभम गुप्ता यांनी मंगळवारी सायंकाळी अचानक शिक्षण विभागास 'सरप्राईज व्हिजीट' दिली. यावेळी सर्व अधिकारी, कर्मचारी जागेवर आढळून आले. गुप्ता यांनी काही कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधत कामकाजाचा आढावाही घेतला.

 धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  शुभम गुप्ता यांनी मंगळवारी सायंकाळी अचानक शिक्षण विभागात हजेरी लावली. सीईओ . गुप्ता अचानक कार्यालयात दाखल झाल्याने काही क्षणासाठी कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. यावेळी शिक्षण विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. गुप्ता यांनी काही कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधत कामकाज समजून घेतले.

Web Title: CEO Shubham Gupta's 'Surprise Visit' to Education Department

टॅग्स :Dhuleधुळे