लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शनिवारी १३ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सहा रूग्ण कोरोनामुक्त होऊ घरी परतले तर शिरपूर उपजिल्हा रूग्णालयात उपचार घेत असलेल्या सात रूग्णांनी कोरोनावर मात केली.कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांना डॉक्टरांनी टाळ्यांच्या कडकडाटात निरोप देण्यात आला. यावेळी अधिष्ठाता डॉ.पल्लवी सापळे, वैद्यकीय अधिक्षक राजकुमार सुर्यवंशी, समन्वयक डॉ. दिपक शेजवळ, डॉ. निर्मलकुमार रवंदळे आदि उपस्थित होते. आतापर्यंत जिल्ह्यातील ११० रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शनिवारी कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांमध्ये धुळे शहरातील तीन व शिरपूर येथील १० रूग्णांचा समावेश आहे. धुळे शहरातील गल्ली क्रमांक चार येथील ५६ वर्षीय पुरूष व ४५ वर्षीय महिलेने कोरोनावर मात केली आहे. तसेच राजेंद्र सुर्यनगर येथील रहिवासी असलेल्या ४५ वर्षीय पुरूष कोरोनामुक्त झाला आहे.शिरपूर येथील कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांमध्ये पाटीलवाडा येथील दोन तर पारधीपुरा येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. पाटील वाड्यातील ७१ वर्षीय पुरूष व ६९ वर्षीय महिला तसेच पारधीपुरा येथील ६५ वर्षीय पुरूषाने कोरोनावर विजय मिळवला आहे. तसेच उपजिल्हा रूग्णालय शिरपूर येथे उपचार घेत असलेल्या अंबिका नगर परिसरातील सहा व पाटील वाड्यातील एका रूग्णाने कोरोनावर मात केली आहे.
कोरोनामुक्त रूग्णांचे शतक पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 13:20 IST