मध्यवर्ती बसस्थानक झाले ‘डबक्यां’चे आगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 21:36 IST2019-07-31T21:36:13+5:302019-07-31T21:36:28+5:30

धुळे : जागोजागी पडलेल्या खड्यांमध्ये साचले पाणी, प्रवाशांना स्थानकाच्या आवारात चालणे कठीण, अधिकायांचे दुर्लक्ष

The central bus station became the 'dump' reservoir | मध्यवर्ती बसस्थानक झाले ‘डबक्यां’चे आगार

धुळे येथील मध्यवर्ती बसस्थानकात जागोजागी पडलेल्या खड्यांमध्ये साचलेले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : गेल्या काही दिवसांपासून पासून सुरू असलेल्या पावसामुळे येथील मध्यवर्ती बसस्थानकातील खड्यांमध्ये जागोजागी पाणी साचले आहे. त्यामुळे हे जिल्ह्याचे बसस्थानक आहे की ‘डबक्यां’चे आगार असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. खड्डे बुजविण्याची तसदीही एस.टी. महामंडळातर्फे घेतली जात नसल्याचे प्रवाशांची ओरड आहे. 
तीन राज्याच्या सीमेवर असलेल्या येथील मध्यवर्ती बसस्थानकात पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत हजार पेक्षा बसगाड्या येतात व जातात. त्याद्वारे हजारो प्रवाशी या ठिकाणाहून प्रवास करतात. या स्थानकात उतरतात. दिवसभर प्रवाशांची वर्दळ असलेल्या या बसस्थानकात सुविधांची वानवा आहे. स्थानकाच्या आवारात धड डांबरीकरणही नाही याचा प्रत्यय प्रवाशांना येऊ लागला आहे. 
बसस्थानकाच्या आवारातील खडी उखडल्याने, जागोजागी खड्डे पडलेले आहेत. येथे बसपोर्ट होईल म्हणून अनेक वर्षांपासून स्थानकाच्या आवारात डांबरीकरणही करण्यात आलेले नाही. मध्यंतरी या स्थानकाच्या आवारात पडलेल्या खड्यांमध्ये जुन्या बांधकामाचे साहित्य टाकून खड्डे बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला. मात्र तो केवळ दिखावूपणा होता असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
मुंबई, कोकण परिसरात अतिवृष्टी होत आहे, त्यामानाने धुळ्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे. मात्र पडत असलेल्या पावसामुळे मध्यवर्ती बसस्थानकातील खड्डयांमध्ये जागोजागी पाणी भरले आहे. त्यामुळे हे जिल्ह्याचे बसस्थानक आहे की, डबक्यांचे आगार असा प्रश्न प्रवाशांना पडलेला आहे. 
प्रवाशांच्या अंगावर उडते पाणी
स्थानकात येणाºया बसेस अतिशय भरधाव वेगाने येत असतात. खड्यांमधील पाणी प्रवाशांच्या अंगावर उडते याचे भान चालकांना नसते. त्यामुळे प्रवाशांचेच कपडे खराब होत असतात. स्थानकात जागोजागी खड्डे पडल्याने, प्रवाशांना धड चालता येत नाही, अशी स्थिती आहे.  बसपोर्ट होईल तेव्हा होईल मात्र मध्यवर्ती बसस्थाकाच्या आवारातील खड्डे तर बुजवायला पाहिजे असे प्रवाशांचे म्हणणे आहे. वरिष्ठ अधिकाºयांचेही याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बस स्थानकाच्या आवारात डांबरीकरण केलेले असते, परंतु जिल्ह्याच्या ठिकाणच्या बसस्थानकात डांबरीकरण होऊ नये ही आश्चर्याची बाब आहे. 
बसस्थानकाचा आवार खड्डेमुक्त करावा. याठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्याची मागणी प्रवाशी वर्गाकडून होत आहे. 
पेव्हर ब्लॉक बसवावेत
स्थानकात प्रवेश करण्याची सुरूवातच खड्डयाने होत असतो. बाहेरगावाहून येणाºया बसगाड्या ज्या दिशेने येतात, तेथे मोठा खड्डा पडला आहे. त्याचबरोबर बस बाहेर पडण्याच्या दिशेलाही अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. डांबरीकरण काही वर्षांने निघून जाते. यावर पर्याय म्हणून स्थानकाच्या संपूर्ण आवारात पेव्हर ब्लॉक बसवावेत. म्हणजे बसस्थानक ‘खड्डेमुक्त’ होण्यास मदत मिळेल.

Web Title: The central bus station became the 'dump' reservoir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे