हस्ती स्कूल येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:35 IST2021-03-10T04:35:58+5:302021-03-10T04:35:58+5:30
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आशा मन्सुरी होत्या. तसेच शालेय समिती सदस्या डॉ. मंजिरी सोहनी, डॉ. युतिका भामरे, ...

हस्ती स्कूल येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आशा मन्सुरी होत्या. तसेच शालेय समिती सदस्या डॉ. मंजिरी सोहनी, डॉ. युतिका भामरे, शालेय सल्लागार समिती उपाध्यक्षा सुषमा जैन व प्राचार्य हरिकृष्ण निगम, उप प्राचार्य रजिया दाउदी आणि पालक-शिक्षक संघ सदस्य सारिका अग्रवाल, समता जैन या मान्यवर उपस्थित होत्या.
प्रास्ताविक नंतर विद्यार्थिनी रोशनी भलकार (९वी), रागिणी गांगुर्डे (१०वी) तसेच उप प्राचार्य रजिया दाउदी यांनी ' समाजात आजच्या महिलांचे स्थान व महत्त्व ' यावर मनोगते व्यक्त केली. यानंतर अधिवक्ता आशा मन्सुरी यांनी ' महिला सुरक्षा या दिवशी शाळेची हेड गर्ल कानन जैन हिने शाळेच्या प्राचार्य पदाची व सिमरन अग्रवाल हिने उपप्राचार्य पदाची जबाबदारी सांभाळली.
सोबतच हस्ती स्कूलच्या शिक्षिकांसाठी राजमाता जिजाऊ, खान्देश कन्या बहिणाबाई चौधरी, सुवर्ण कन्या पी. टी. उषा व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अशा चार गटांत ' स्री शक्ती - सामान्यज्ञान व मनोरंजन ' विषयावर प्रश्नमंजूषा आयोजित करण्यात आली. यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले गटातील-वंदना पाटील, आर्वा कटलरी, पुष्पा साळवे, ज्योती बोरसे, स्वाती पाटील, अन्नू जाधव व ज्योत्स्ना सोनार या शिक्षिकांनी प्रथम क्रमांक पटकावला. कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थिनी पृथा चव्हाण, सिमर माखिजा, आयुषी जैन, फातेमा दाउदी, परिणीती बागल, परी भावसार, आदिबा शाह व सारिया पिंजारी यांनी महिला सक्षमीकरणावर आधारीत मर्दानी हिंदी चित्रपटातील ' गन गगन गन ' या गीतावर सुंदर समूहनृत्य सादर केले. तसेच जागतिक पातळीवर ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय, क्रीडा अशा क्षेत्रात नावलौकिक प्राप्त स्री व्यक्तिरेखांच्या वेशभूषा विद्यार्थिनींनी केल्या होत्या. यात कोमल जैन, वाची अग्रवाल, तनुश्री जाधव, देवश्री भावसार, रविषा पाटील, किंजल गुजराथी, समृद्धी सोलंकी, कृतिका गोसावी, निकिता पाटील, कशिष चव्हाण, हर्षदा आव्हाड, नेहा ठाकरे, ग्रिष्मा जैन, कृतिका जैन, यशश्री पवार, सारिका घुगे यांचा समावेश होता.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हेड गर्ल कानन जैन, व्हा. हेड गर्ल सिमरन अग्रवाल, हेड बॉय योगिराज चित्ते, व्हा. हेड बॉय लक्ष पवार तसेच चाणाक्षी पवार, सिद्धी पाटील, रक्षा जैन, हितेश्वरी पाटील, कृपाल चौधरी सर्व इ. ९वी, सुखदा सोनवणे, पूर्वा जाधव व उन्नती सूर्यवंशी सर्व इ. १०वी. तसेच हिंदी विभागप्रमुख विजेंद्र भोई, हिंदी विषय शिक्षक मनोज ठाकूर, अजित मन्सुरी, महेंद्र गिरासे, संजय मोरे, अनिल कोळी, शीतल पाटिल व धनश्री खैरनार यांनी परिश्रम घेतले.