नेर येथे महिला दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:36 IST2021-03-10T04:36:00+5:302021-03-10T04:36:00+5:30
महिला दिन साजरा नेर : येथील ग्रामपंचायतच्या सभागृहात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने नेर गावातील अंगणवाडी सेविका, ...

नेर येथे महिला दिन साजरा
महिला दिन साजरा
नेर : येथील ग्रामपंचायतच्या सभागृहात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने नेर गावातील अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मापत्र देऊन गौरव करण्यात आला. सरपंच गायत्रीदेवी जयस्वाल यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपसरपंच लीलाबाई गोकूळ सोनवणे, महिला ग्रामपंचायत सदस्या उपस्थित होत्या. तसेच ग्रामपंचायत लिपिक संजय वाघ, हर्षल मोरे, राकेश जाधव, शिपाई बापू सोनवणे आदी उपस्थित होते. महिला दिनाचे औचित्य साधून गावातील युवकांनी सरपंच गायत्रीदेवी जयस्वाल यांचा सरपंचपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. याप्रसंगी योगेश सोनवणे, इम्तियाज पठाण, शौकत जहागीरदार, अकील मौलाना राकेश अहिरे आदी उपस्थित होते.