वालखेडा शाळेत पाणथळ दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 12:11 IST2020-02-17T12:10:43+5:302020-02-17T12:11:21+5:30
दोंडाईचा : ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’सह जीवसृष्टीबाबत मार्गदर्शन

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा : विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून ‘पाणी अडवा पाणी जिरवा’सह जीवसृष्टी व पानथळबाबत माहिती मिळावी या उद्देशाने शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा येथील आण्णासाहेब रंगराव पाटील माध्यमिक विद्यालयात पाणथळ दिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संतोष चव्हाण होते. प्रमुख पाहुणे म्हणून विज्ञान-गणित संचाचे विज्ञान शिक्षक आर.व्ही. खैरनार, नेरपगार उपस्थित होते.
यावेळी आर.व्ही. खैरनार म्हणाले, पाणथळमुळे जीवसृष्टीस हातभार लागतो. पाणथळ वनस्पती पाणी शुद्ध करण्यास मदत करतात. तसेच या वनस्पतीमुळे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. विविध भागातील पक्षी पाणथळ असलेल्या भागात निवास करतात. पर्यावरणास हातभार लावणारी जीवसृष्टी वाढते. नदी, तलाव, सागरी किनाऱ्यावर नैसर्गिक पाणथळ असून मिठागरे, मानव निर्मित तलाव, सांडपाणी तलाव, शेततळी, मत्स्यशेती, खाचरे यास कृत्रिम पाणथळ म्हणतात. पाणी अडवा-पाणी जिरवा मोहिमेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.