नेरला मिरवणूक काढून आदिवासी दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:41 IST2021-08-12T04:41:05+5:302021-08-12T04:41:05+5:30
धुळे जिल्हा आदिवासी पारधी महासंघाचे जिल्हाध्यक्ष किशोर चव्हाण यांच्या हस्ते आदिवासी पारधी महासंघ कार्यकारिणीच्या नेर शाखेचे फलक अनावरण करण्यात ...

नेरला मिरवणूक काढून आदिवासी दिन साजरा
धुळे जिल्हा आदिवासी पारधी महासंघाचे जिल्हाध्यक्ष किशोर चव्हाण यांच्या हस्ते आदिवासी पारधी महासंघ कार्यकारिणीच्या नेर शाखेचे फलक अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य आदिवासी पारधी महासंघाच्या राज्य महिला उपाध्यक्षा रत्नाताई चव्हाण, राज्य उपाध्यक्ष बापू पारधी, जिल्हा अध्यक्ष किशोर चव्हाण, जिल्हा सचिव रवींद्र चव्हाण, उपाध्यक्ष नगराज सोळंकी, अनुप दाभाडे, हेमराज पवार, मंगलसिंग पवार, वसंत चव्हाण, तालुकाध्यक्ष जगदीश शिंदे उपस्थित होते. यावेळी बापू पारधी, किशोर चव्हाण, रवींद्र चव्हाण यांनी आदिवासी दिनानिमित्त विविध योजनांविषयी माहिती दिली. तसेच पारधी समाजाच्या अडचणी, पारधी समाज जनजागृतीविषयी मार्गदर्शन केले. पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. संध्याकाळी नूरनगर वस्तीतून मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदिवासी पारधी महासंघाचे शाखाध्यक्ष भटू पारधी, शाखा उपाध्यक्ष पंकज चव्हाण, शाखा सचिव दीपक पारधी, मच्छिंद्र पारधी, पंडित पारधी, दयाराम पारधी, प्रभाकर पारधी, धनराज पारधी, भाऊसाहेब पारधी, रामचंद्र पारधी, सुभाष पारधी, लक्ष्मण पारधी, भारती पारधी यांनी परिश्रम घेतले. रवींद्र चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.