नरडाणा येथे शिक्षक दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:43 IST2021-09-07T04:43:24+5:302021-09-07T04:43:24+5:30
खर्दे शिरपूर तालुक्यातील खर्दे बुद्रुक येथील आर.सी. पटेल मराठी प्राथमिक शाळेत डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी ...

नरडाणा येथे शिक्षक दिन साजरा
खर्दे
शिरपूर तालुक्यातील खर्दे बुद्रुक येथील आर.सी. पटेल मराठी प्राथमिक शाळेत डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिकेची भूमिका तेजस्विनी गुजर हिने बजावली. डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका क्रांती जाधव यांनी केले. कार्यक्रमासाठी एल.बी. राजपूत, भारती पाटील, रमेश शिरसाठ, रुपाली राजपूत, विजय गुजर आदींनी परिश्रम घेतले.
भोरखेडा
शिरपूर तालुक्यातील भोरखेडा येथील आर.सी. पटेल मराठी प्राथमिक शाळेत शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जितेंद्रसिंग राजपूत, सरपंच दीपक भील, सचिन राजपूत, शिवाजी जमादार, भूपेंद्रसिंग राजपूत, रघुनाथ जमादार, ताराचंद मोरे, विनोद सूर्यवंशी, मुख्याध्यापिका रेखा सूर्यवंशी उपस्थित होते. मुख्याध्यापक ईश्वर पाटील यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवनचरित्रावर मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापिका रेखा सूर्यवंशी यांच्या बदलीनिमित्त भेटवस्तू देऊन स्वागत करण्यात आले. शिक्षक दिनानिमित्त मुख्याध्यापकांकडून शिक्षक व कर्मचाऱ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
सावळदे
शिरपूर तालुक्यातील सावळदे येथील आर. सी. पटेल विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका एन. पी. देवरे होत्या. विद्यार्थ्यांनी अध्यापनाबरोबर शालेय व्यवस्थापनाचा अनुभव घेतला. देवरे यांच्या हस्ते विद्यार्थी शिक्षकांचा व शाळेतील सहकारी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. ‘थँक्स टीचर’ उपक्रमाअंतर्गत शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एम. एल. जाधव, ए. बी. निळे, व्ही. बी. गाढवे, एस. आर. बोरसे, जी. डी. शिवदे, एस. एल. भील, पी. आर. माळी, एस. आर. जावरे, एस. एफ. शिरसाठ, बी. पी. रोकडे आदी उपस्थित होते.