घरी थांबूनच रमजान ईद साजरी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:37 IST2021-05-12T04:37:36+5:302021-05-12T04:37:36+5:30
शुक्रवारी मुस्लीम बांधवांचा रमजान ईद आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी दोडाईचा पोलीस स्टेशनला मुस्लीम धर्मगुरू ...

घरी थांबूनच रमजान ईद साजरी करा
शुक्रवारी मुस्लीम बांधवांचा रमजान ईद आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी दोडाईचा पोलीस स्टेशनला मुस्लीम धर्मगुरू व मुस्लीम कार्यकर्ते यांची छोटेखानी बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत समुद्दीन शेख, मंजुम पठाण, उपनगराध्यक्ष नबु पिंजारी, जब्बार बागवान, कय्युम पठाण, सुलतान मन्सुरी, निजामोद्दीन पिंजारी, सलाम शाह, निजामोद्दीन मन्सुरी, रज्जाक बागवान, सुलतान शेख, समद शेख, हारुन पटेल, इकबाल बागवान, इकबाल पिंजारी, अजित शाह, बुऱ्हाण शाह आदी उपस्थित होते.
दुर्गेश तिवारी म्हणाले की, रमजान ईद मुस्लीम बांधवानचा पवित्र सण असून, भाईचारा वाढवणारा सण आहे. कोरोनाचा प्रादुभाव सर्वत्र वाढत असून, शासनाचा मार्गदर्शक तत्त्वानुसार आपणास सण साजरा करावयाचा आहे. सकाळी ११पर्यंत आपण कपडे व इतर साहित्य खरेदी करावे. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने, आपण रमजान ईद शांततेत, घरात व कुटुंबासोबत साजरा करावी, नियमांचे पालन करा, जेणेकरून कोरोनाचा संसर्ग होणार नाही, असे आवाहन करण्यात आले. सर्व उपस्थितांनी रमजान ईद घरातच साजरी करण्यास होकार दर्शविल्याचे सांगण्यात आले.