‘संविधान दिन’ सर्वत्र साजरा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 22:41 IST2019-11-15T22:41:16+5:302019-11-15T22:41:39+5:30
मागणी : भारतीय संविधान संरक्षण समितीकडून निवेदन सादर

‘संविधान दिन’ सर्वत्र साजरा करा
धुळे : जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालय, शासकीय व प्रशासकीय कार्यालयामध्ये २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन म्हणून साजरा करणे आणि संविधान प्रस्तावना वाचन करण्याचे लेखी आदेश देण्यात यावे अशी मागणी भारतीय संविधान संरक्षण समितीतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली़
१५ आॅगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वतंत्र होऊन संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर जबाबदारी देवून ती पूर्ण केली आणि २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारत देशाला प्रदान केली़ त्या दिवशी संविधान अंगीकारले म्हणून २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो़
आपल्या अधिपत्याखाली येणारा संपुर्ण धुळे जिल्ह्यातील प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालय तसेच शासकीय व प्रशासकीय कार्यालयामध्ये ‘संविधान दिन’ साजरा करणे, प्रस्तावना, उद्देशिकांचे वाचन करण्याचे लेखी आदेश देण्यात यावे़ जेणे करुन संपुर्ण जनतेस संविधान बांधिलकीची जाणीव झाली पाहीजे, तसे आदेश देण्यात यावे़ निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन सादर केले़ निवेदनावर हरिश्चंद्र लोंढे, प्रभाकर खंडारे, अॅड़ साहेबराव भामरे, शंकर खरात, भगवान बाविस्कर, प्रा़ डॉ़ नागसेन बागुल, विशाल पगारे, सतीष अमृतसागर, चंद्रमणी खैरनार, दिनेश कापुरे, जॉनी पवार, दादाजी मोहिते, सनी सोनवणे, दिनेश पेंढारकर यांची नावे आहेत़