नशेच्या गोळ्या नेणारे वाहन पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:42 IST2021-09-15T04:42:06+5:302021-09-15T04:42:06+5:30
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सेंधव्याकडून शिरपूरकडे एक चारचाकी वाहन येत असून त्यात नशेच्या गोळ्या असल्याची गोपनीय माहिती शिरपूर तालुका पोलीस ...

नशेच्या गोळ्या नेणारे वाहन पकडले
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सेंधव्याकडून शिरपूरकडे एक चारचाकी वाहन येत असून त्यात नशेच्या गोळ्या असल्याची गोपनीय माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळाली. त्यानुसार, शिरपूर तालुक्यातील पनाखेड शिवारात पोलिसांनी सापळा लावला होता. १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास एमपी ४६ जी २३४९ क्रमांकाचे चारचाकी वाहन आल्यानंतर ते अडविण्यात आले. त्याची तपासणी केली असता त्यात ७ हजार ९२० रुपये किमतीच्या नशेच्या गोळ्या पोलिसांना आढळून आल्या. ५ लाखांच्या वाहनासह नशेच्या गोळ्या पोलिसांनी जप्त केल्या. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. त्यानुसार, नानीराम धरमसिंग ऊर्फ मुन्ना भुगवाडे (३५, बेडीफल्या घेरुघाटी ता. वरला जि. बडवाणी, मध्यप्रदेश) याला अटक करण्यात आली.