पाच दुचाकीसह दोघांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:47 IST2021-06-16T04:47:35+5:302021-06-16T04:47:35+5:30

५ जून रोजी मंजूरअली वाजीदअली सैय्यद (३२, रा. दत्त नगर, मालेगाव) यांची दुचाकी शहरातील मुस्लिम नगरातील नातेवाईकांच्या घरासमोरुन ...

Caught two with five bikes | पाच दुचाकीसह दोघांना पकडले

पाच दुचाकीसह दोघांना पकडले

५ जून रोजी मंजूरअली वाजीदअली सैय्यद (३२, रा. दत्त नगर, मालेगाव) यांची दुचाकी शहरातील मुस्लिम नगरातील नातेवाईकांच्या घरासमोरुन चोरट्याने लंपास केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास सुरु असतानाच अरशद मन्यार आणि रिजवान अन्सारी हे दररोज विना क्रमांकाच्या वेगवेगळ्या गाड्या फिरवित असतात. दोघे शंभर फुटी रोडवरील सरदार हॉलसमोर उभे आहेत. त्यांना ताब्यात घेतल्यास चोरीच्या दुचाकी मिळू शकतात, अशी गोपनीय माहिती चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांना मिळाली. माहिती मिळताच त्यांना छापा टाकून ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. पोलिसी हिसका दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून गुन्ह्यतील दुचाकीसह अन्य चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. त्याची किंमत १ लाख १५ हजार रुपये इतकी आहे. दरम्यान या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले असता बुधवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Web Title: Caught two with five bikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.