Cases of power theft filed in Shindkheda taluka | शिंदखेडा तालुक्यात विजचोरीचे गुन्हे दाखल

शिंदखेडा तालुक्यात विजचोरीचे गुन्हे दाखल

धुळे : जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात अनेक गावात विजेच्या खांबावर आकडे टाकून वीज चोरी केली जात असल्याने महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात वीजचोरी पकडून पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविले आहेत़
नरडाणा झोनचे कनिष्ठ अभियंता जितेंद्र सुरेश सोंजे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार राजेंद्र दोधा पाटील (रा़ गोराणे), रामा भटा खैरनार (रा़ सुकवद), जमुनाबाई प्रताप पारधी (रा़ वर्षी), लक्ष्मण वामन पाटील (रा़ तावखेडा), नारायण रघुनाथ पाटील (रा़ सुकवद), सुनील शालीग्राम पाटील (रा़ पिंपरखेडा), भास्कर आत्माराम पाटील (रा़ पिंपरखेडा), जनाबाई धनराज पाटील (रा़ तावखेडा) या संशयितांनी त्यांच्या राहत्या घरासाठी विजेच्या खांबावर आकडे टाकून वीज पुरवठा सुरु केला आणि विजेची चोरी केली़ त्यामुळे कंपनीला ८४ हजार ६२० रुपयांचे नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे़ पोलीस उपनिरीक्षक मुरकुटे घटनेचा तपास करीत आहेत़
नरडाण्याचे सहायक अभियंता हेमंद्रसिंग मोतीसिंग जगनिया यांनी फिर्याद दाखल केली़ त्यानुसार सुरेश विठ्ठल परदेशी (रा़ अजंदे), जय बालाजी इंटरप्रायजेस (रा़ बाभळे), रामराव अर्जुन (रा़ अजंदे), सुनील बाळकृष्ण पाटील (रा़ अजंदे), सुरेखाबाई रविंद्र पाटील (रा़ कंचनपूर), परशराम भगा पाटील (रा़ कंचनपूर), शोभाबाई शांताराम पाटील (रा़ वालखेडा) या संशयितांनी वीज खांबावर आकडे टाकून विजेची चोरी केली़ त्यामुळे वीज कंपनीला ६३ हजार ८३० रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे़

Web Title: Cases of power theft filed in Shindkheda taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.