कारची पोलीस जीपला धडक, पाच जखमी
By Admin | Updated: January 24, 2017 00:50 IST2017-01-24T00:50:25+5:302017-01-24T00:50:25+5:30
कराची खुटांजवळील घटना : चालकाविरुद्ध गुन्हा

कारची पोलीस जीपला धडक, पाच जखमी
धुळे : नंदुरबारकडे जाणा:या पोलीस जीपला भरधाव कारने धडक दिल्याची घटना रविवारी पहाटे शहरातील कराचीवाला खुंटजवळ घडली़ त्यात नंदुरबार येथील दोन पोलीस कर्मचा:यांसह पाच जण जखमी झाले आहेत़
नंदुरबार मुख्यालयातील पो़कॉ. विशाल विजय गावीत, पो़ना. बिंद्या फुलजी पाडवी हे पोलीस जीपने (क्ऱएमएच 39 ए 0235) 22 जानेवारी रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास शहरातील जुन्या आग्रा रोडने नंदुरबारकडे जात असतांना त्यांच्या जीपला पारोळा रोडवरील कराची वाला खुंटाजवळ सुरतकडून एरंडोलकडे भरधाव वेगाने जाणा:या कारने (क्ऱ जी़जे 05 सी़एच 5286) किनर साईटच्या दरवाजावर जोरदार धडक दिली़ त्यात वरील दोघे पोलीस कर्मचा:यांसह कारमधील शेख जावेद शेख गुलाम, खान हारून रशीद दोघे (रा़ लिंबायत, सुरत, गुजरात) व कारचालक शेख करीम शेख दिलावर (वय 35, रा़ रेल राहत कॉलनी, मिठी खाडी, सुरत) हे जखमी झाल़े याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अरुण शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कार चालक शेख करीम शेख दिलावर विरुध्द भादंवि कलम 279, 337, 427 व मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आह़े