काेरोना योद्धांचा सत्कार आणि लॅबचे उद्‌घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:25 IST2021-06-26T04:25:03+5:302021-06-26T04:25:03+5:30

यावेळी व्यासपीठावर महाराष्ट् प्रदेश काँग्रेस उत्तर महाराष्ट्र प्रभारी आ. प्रणितीताई शिंदे, राष्ट्रीय काँग्रेसचे उपाध्यक्ष श्याम पांडे , प्रदेश ...

Carona warriors felicitated and lab inaugurated | काेरोना योद्धांचा सत्कार आणि लॅबचे उद्‌घाटन

काेरोना योद्धांचा सत्कार आणि लॅबचे उद्‌घाटन

यावेळी व्यासपीठावर महाराष्ट् प्रदेश काँग्रेस उत्तर महाराष्ट्र प्रभारी आ. प्रणितीताई शिंदे, राष्ट्रीय काँग्रेसचे उपाध्यक्ष श्याम पांडे , प्रदेश उपाध्यक्ष भाई नगराळे, प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश सरचिटणीस व धुळे जिल्हा प्रभारी विनायकराव देशमुख, धुळे जिल्हाध्यक्ष शाम सनेर, कार्याध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील, जवाहर संसस्थेचे उपाध्यक्ष डॉ. भाईदास पाटील, माजी मंत्री रोहिदास पाटील, डॉ.ममता पाटील, सहसचिव संगीता पाटील, अधिष्ठाता डॉ. विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार कुणाल पाटील यांनी आपल्या भाषणात जवाहर फाउंडेशनच्या कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले. फाउंडेशनच्या या सैनिकांमुळे कोरोनाचा दर शून्यावर आल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही कठीण प्रसंगात आमची ही फौज डगमगणारी नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अधिष्ठाता डॉ.विजय पाटील यांनी कोविडच्या कितीही लाटा आल्या तरी आमचे आरोग्य कर्मचारी त्याला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले. मुख्‍य अतिथी व मान्यवरांच्या हस्ते स्कील लॅबचे उद‌्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास मेडिकल व डेंटल कॉलेजचे प्राध्यापक, कर्मचाऱ्यांसह माजी आमदार शरद पाटील, नाशिक जिल्हा काँग्रेसचे शरद आहेर, डॉ. तुषार शेवाळे, युवक काँग्रेस नाशिक जिल्हा प्रमुख स्वप्नील पाटील, धुळे जिल्हा युवक काँग्रेसचे गणेश गर्दे तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉक्टरांसह सेवकांचा सन्मान

कार्यक्रमात कोविड काळात अहोरात्र सेवा देणाऱ्या डॉक्टर्स तसेच आरोग्य सेवकांचा यावेळी सन्मान करण्यात आला. त्यात जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या डॉ.ममता पाटील, मेडिसीन विभाग प्रमुख डॉ.दिलीप पाटील, डॉ.रोहन कुलकर्णी, डेंटलचे अधिष्ठाता डॉ.अरुण दोडामनी, म्युकरमायकोसिस वॉर्डचे प्रमुख डॉ.बी.एम.रूडगी, डेंटल कॉलेजचे इंटर्न, ऑक्सिजन पुरवठा करणारे अल्ताफ, मॅनेजमेंट टीम, नर्सेस, वॉर्डबॉय, रेडिओलॉजी विभाग, लॅबचे कर्मचारी अशा सर्वांचा समूह सन्मान करण्यात आला.

Web Title: Carona warriors felicitated and lab inaugurated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.