पाण्याअभावी कारल्याची बाग अखेर उद्ध्वस्तच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 12:09 IST2019-04-07T12:08:54+5:302019-04-07T12:09:37+5:30
विदारकता। धुळे तालुक्यातील दयनीय स्थिती, भाजीपाला टिकविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

dhule
प्रदीप पाटील ।
तिसगाव : धुळे तालुक्यात पाण्याअभावी भाजीपाला पिकांची बाग करपली जात असून कारले पिकांना फटका बसत आहे़ तालुक्यातील तिसगाव येथील मारोती विठोबा ठेलारी या शेतकऱ्याने कारल्याची लागवड केली होती़ परंतु पाण्याअभावी ती करपल्याने परिणामी लाखो रूपयांचे नुकसान झाले़ संपूर्ण शेतच ओसाड झाले आहे़
निसर्गाचा लहरीपणाचा फटका शेतकºयाला नेहमी सोसावा लागतो़ यावर्षी अत्यल्प पाऊस पडला आणि उत्पादनात प्रचंड घट झाली़ परिणामी बळीराजाची दयनीय अवस्था झाली आहे़ कमी पावसामुळे विहिरींनी तळ गाठला असून भाजीपाला पिकात मोठ्या प्रमाणावर घट झाली़ खर्च सुद्धा निघेणासा झाला आहे़ या कारले रोपांसाठी महागडे बियाणे आणून ते तळ हातावरच्या फोडासारखे जपून बेड पद्धतीची मल्चिंग लागवड करून एक बिघे क्षेत्राकरीता मल्चिंग पेपर अठरा हजार रुपये, दोन ट्रॅक्टर खत दहा हजार रुपये, बियाणे, लागवड, फवारणी, ड्रीप यासाठी सुमारे पंचवीस हजार रुपये आणि वेल उगवण क्षमता उत्तम असावी म्हणून उभा करण्याच्या मजुरीसकट चाळीस हजार रुपये असे एकूण ९३ हजार रुपये खर्च करून पाण्याअभावी संपूर्ण बाग जळून खाक झाली़ जी विहीर जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत विहीर तळ गाठत नव्हती, त्या विहिरीत आत्ता चमचाभर सुध्दा पाणी दिसत नाही़ अशी विदारक परिस्थिती या वर्षी निर्माण झाली आहे़ आणि या शेतकºयाच्या आजूबाजूच्या विहिरींना तळ ठोकला असून आज या शेतकऱ्यांना या भिषण संकटाला सामोरे जावे लागत आहे़ मोठ्या आशेने खर्च झालेल्या या कारले पिकाच्या बागेवर आपला काहीतरी उदरनिर्वाह होईल अशा आशेने जगणारा शेतकरी, आज संपूर्ण बागेसह उध्वस्त झाल्याचे चित्र डोळ्यादेखत समोर आहे़ एखाद दोन लहान मोठ्या कारल्याची तोडणी करून २० ते २५ रुपये की संपूर्ण शेतातून ४ ते ५ क्विंटल विकून तुटपुंजी रक्कम घेऊन हताश आणि निराश झालेला हा बळीराजा शेतात लाखो रुपये खर्च करणारा शेतकरी आज आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण करु शकत नाही़ अशी या शेतकºयांची दयनिय अवस्था आहे़ शेतानजीक एखादं दोन बंधारे झाले असते तर ही परिस्थिती शेतकºयांवर आज आलीच नसती़ लाखो रुपये खर्च केले, मला कल्पनाही नव्हती की माझ्या विहिरीचे पाणी एवढ्या लवकर आटून जाईल असे मारुती माने यांचे म्हणणे आहे़
अन्यथा, प्रश्न होऊ शकतो बिकट
४शासनाने धुळे तालुक्यातील तिसगाव व या आजुबाजुच्या परिसरात पाणी अडवण्यासाठी कायम स्वरूपाची सोय करून द्यायला हवी़ त्याची आज गरज आहे़ वेळीच दखल घेतल्यास पाणी अडविण्याची सोय होऊ शकते, नाहीतर शेतकºयांसमोर बिकट प्रश्न निर्माण होऊ शकतो़