जात प्रमाणपत्र देताना होतेय कागदपत्रांची बारकाईने चाैकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:36 IST2021-02-10T04:36:45+5:302021-02-10T04:36:45+5:30
या कार्यालयात रोज प्रकरणे दाखल हाेत असतात आणि तेवढ्याच प्रमाणात त्यांचा निपटारादेखील केला जात असतो. ही अव्याहत चालणारी प्रक्रिया ...

जात प्रमाणपत्र देताना होतेय कागदपत्रांची बारकाईने चाैकशी
या कार्यालयात रोज प्रकरणे दाखल हाेत असतात आणि तेवढ्याच प्रमाणात त्यांचा निपटारादेखील केला जात असतो. ही अव्याहत चालणारी प्रक्रिया आहे. अनेकांकडून प्रमाणपत्राची मागणी होत असताना काळ ओळखून त्यानुसार त्यांची कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जातो. नुकत्याच झालेल्या निवडणुकीमुळेसुद्धा या कामाच्या गतीवर परिणाम झाला होता. आता विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राची गरज असल्यामुळे त्यांच्या कामाला प्राधान्य दिले जात आहे.
समितीकडील मनुष्यबळ
धुळे जिल्हा जात पडताळणी समितीकडे सध्या तरी पुरेसे मनुष्यबळ कार्यरत आहेत. त्यामुळे आता तरी मनुष्यबळाचा अभाव आहे असे म्हणता येणार नाही. जात पडताळणी समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, लिपिक, शिपाई असे किमान लागणारे कर्मचारी सध्या या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून काम करून घेत असताना काॅन्ट्रॅक्टवरील काही कर्मचारी वर्गाकडूनदेखील मदत घेतली जात आहे. त्यामुळे काम वेगाने सुरू असते.
जातीचे प्रमाणपत्र देत असताना सुरुवातीला ते काेणाला द्यायचे, हे ठरवत असताना सध्या शाळेचा काळ सुरू असल्याने विद्यार्थ्यांना सर्वात जास्त प्राधान्य देऊन त्यांना प्रमाणपत्र वितरित केले जात आहे. दाखल होणाऱ्या प्रकरणाची चाैकशी, पडताळणी केली जात नाही तोपर्यंत संबंधितांना प्रमाणपत्र दिले जात नाही. आवश्यक ती कागदपत्रे त्यांनी सादर केल्यास लवकर प्रमाणपत्र दिले जाईल.
- नंदकुमार बेडसे,
अध्यक्ष, जात प्रमाणपत्र समिती
जातीचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रकरण या कार्यालयात सादर करण्यात आले आहे. आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर आमच्या प्रकरणाचा निपटारा करावा. पण, त्यांच्याकडून खूपच चिकित्सकपणे पडताळणी केली जाते. त्यामुळे आम्हाला प्रमाणपत्र मिळायला खूप उशीर होत असल्याने नाराजी आहे. पण, वेळ का लागताे याचा उलगडा मात्र होताना काही दिसत नाही. लवकरात लवकर प्रमाणपत्र द्यावे.
- प्रकरण सादरकर्ते