स्वच्छता कर्मचाऱ्यांची आरोग्याची काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 22:09 IST2019-07-07T22:08:58+5:302019-07-07T22:09:54+5:30
चंद्रकांत जाधव : कर्मचाऱ्यांची कार्यशाळा

dhule
धुळे : आपल्या परिसरातील अस्वच्छतेमुळे भविष्यात आपल्या आरोग्यासाठी धोका निर्माण करू शकतो़ आपल्या आरोग्याची काळजी घेणे ही आपली जबाबदारी असल्याने स्वच्छता कर्मचाºयांनी प्रभागातील स्वच्छता करतांना आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन सहाय्यक आरोग्य अधिकारी चंद्रकांत जाधव यांनी केले़
महापालिका आरोग्य व स्वच्छता विभागाच्यावतीने प्रभागमध्ये स्वच्छता करणाºया सफाई कामगारांची प्रभागनिहाय कार्यशाळा घेण्यात आली़ यावेळी शहरात स्वच्छ सर्वेक्षण २०२० अभियान राबविण्यात येत आहे़ शहरातील घनकचरा व्यवस्थापन, नागरिकांमध्ये जनजागृती, ओला-सुका कचºयाची विल्हेवाट, कर्मचाºयांनी प्रभागनिहाय जबाबदारी संदर्भात माहिती या कार्यशाळेत देण्यात आली़
यावेळी जाधव म्हणाले की, स्वच्छ सर्वक्षण २०२० च्या टॉस्क ३च्या अनुषंगाने शहरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे़ बॅनस लावुन नागरिकांमध्ये जनजागृती देखील करण्यात येत आहे़ प्रभागातील प्रत्येक नागरिकांचा स्वच्छ भारत अभियानात सहभाग नोंदवुन धुळ मुक्त शहर बनविण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन करण्याचे त्यांनी सांगितले़