लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री : लग्न सोहळ्यासाठी जात असलेल्या दाम्पत्याची कार साक्री तालुक्यातील दातर्ती येथील पुलावरुन खाली कोसळली़ यात दोघांना दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले़ ही घटना सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडल्याचा अंदाज आहे़ धुळे तालुक्यातील उभंड येथील रहिवासी गोरख गोपा वाघ हे आपल्या कारने पत्नीसोबत साक्री तालुक्यातील डोमकानी येथे लग्नसोहळ्यासाठी जात होते़ साक्री तालुक्यातील दातर्ती येथील पुलावर त्यांची कार आली असता अचानक कोसळली़ यात कारचे नुकसान झाले असून दोघांनाही दुखापत झाली आहे़ घटना लक्षात येताच बघ्यांची गर्दी झाली होती़ साक्री पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली़ यावेळी अनेकजण मदतीसाठी धावले़ गोरख वाघ हे चाळीसगाव येथे प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत़
साक्री तालुक्यातील दातर्ती पुलावरुन कार कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 13:06 IST
दोघांना दुखापत : मदतीसाठी अनेक सरसावले, जखमींवर उपचार
साक्री तालुक्यातील दातर्ती पुलावरुन कार कोसळली
ठळक मुद्देसाक्री तालुक्यातील घटनापुलावरुन कार खाली कोसळलीजखमी पती-पत्नींवर उपचार सुरु