कार व दुचाकीच्या अपघातात सासूचा जागीच मृत्यू तर जावई जबर जखमी

By Admin | Updated: May 3, 2017 16:51 IST2017-05-03T16:51:07+5:302017-05-03T16:51:07+5:30

कार दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात दुचाकीवरील सुरेखाबाई पाटील या महिलेचा जागीच मृत्यू झाला.

In the car and bike accident, on the spot of death of son-in-law, Javai was injured | कार व दुचाकीच्या अपघातात सासूचा जागीच मृत्यू तर जावई जबर जखमी

कार व दुचाकीच्या अपघातात सासूचा जागीच मृत्यू तर जावई जबर जखमी

 धुळे, दि.3- कार दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातात दुचाकीवरील सुरेखाबाई पाटील या महिलेचा जागीच मृत्यू झाला. धुळ्याजवळील मोराणे शिवारात बुधवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.  

नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावरील धुळ्यापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मोराणे शिवारातील शेवंती इंग्लिश स्कूलजवळ बुधवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास अपघाताची घटना घडली़ एमएच 41 - 2040 या क्रमांकाची दुचाकी कुंडाणे गावाहून धुळ्याकडे येत असताना धुळ्याकडून साक्रीकडे जाणा:या कारने जोरदार धडक दिली़ या अपघातात दुचाकीवरील दशरथ  शेलार जखमी झाले आहेत़ तर सुरेखाबाई हरिश्चंद्र पाटील (45) या महिलेच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला़ जखमी दशरथ शेलार यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल़े सुरेखाबाई पाटील या दशरथ शेलार यांच्या सासू आहेत़

Web Title: In the car and bike accident, on the spot of death of son-in-law, Javai was injured