मतदानापूर्वी उमेदवारांनी घेतले देवाचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:39 IST2021-01-16T04:39:54+5:302021-01-16T04:39:54+5:30
शुक्रवारी मतदान आटोपल्यानंतर बहुतांश उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी श्रमपरिहार केला. ...

मतदानापूर्वी उमेदवारांनी घेतले देवाचे दर्शन
शुक्रवारी मतदान आटोपल्यानंतर बहुतांश उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी श्रमपरिहार केला. काही उमेदवारांनी दिवसभर आकडेमोडही केली.
उमेदवारांनी घेतले सकाळीच देवदर्शन
निवडणूक रिंगणातील बहुतांश उमेदवारांनी सकाळी लवकर उठून आपापल्या गावातील त्यांची श्रद्धा असलेल्या देवदेवतांच्या मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले. त्यानंतरच ते मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले होते.
वॉर्डातील
मतदारांसोबत चर्चा
काही उमेदवारांनी निवडणूक आटोपल्यानंतर आपल्या वॉर्डातील
ठराविक मतदारांची गृहभेट घेत मतदानाचे विश्लेषण जाणून घेतले. तसेच निवडणुकीत पाठीशी उभे राहणाऱ्या मतदारांचे आभारदेखील मानले.
उमेदवारांच्या जय-पराजयावर चर्चा
निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार दिवसभर मतदान केंद्राच्या परिसरातच थांबून होते. कोण मताला येते, कोण आले नाही याची खातरजमा उमेदवार व त्याचे समर्थक करीत होते. सायंकाळपर्यंत हे चित्र सर्वच ठिकाणी बघावयास मिळाले. दरम्यान, मतदान आटोपल्यानंतर झालेल्या मतदानाच्या टक्केवारीवरून उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी जय-पराजयाचे गणित मांडायला सुरुवात केली होती. झालेल्या कमी-जास्त मतदानाचा फायदा-तोटा कोणाला होईल यावरही चर्चा करण्यात आली. प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या तुलनेत आपली बाजू भक्कम कशी होती याची माहिती कार्यकर्त्यांकडून उमेदवारांना पटवून देण्यात येत होती. आता या सर्व उमेदवारांना प्रतीक्षा आहे ती सोमवारी जाहीर होणाऱ्या निकालाची.