उमेदवारांनी संक्रांतीला गोड गोड बोलून मागितली मते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:30 IST2021-01-15T04:30:02+5:302021-01-15T04:30:02+5:30
जिल्ह्यातील १८२ ग्रामपंचायतींसाठी १५ रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी गेल्या आठ-दहा दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. पहिल्या टप्प्यात ...

उमेदवारांनी संक्रांतीला गोड गोड बोलून मागितली मते
जिल्ह्यातील १८२ ग्रामपंचायतींसाठी १५ रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी गेल्या आठ-दहा दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी सुरू होती. पहिल्या टप्प्यात उमेदवार व त्याच्या समर्थकांनी गावातील प्रत्येक वॉर्डावॉर्डात जाऊन जाऊन प्रचाराची मोहीम राबविली होती. मात्र प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना पॅनलप्रमुखांनी जबाबदारी स्वीकारत प्रचाराची जबाबदारी सांभाळली. त्यामुळे निवडणुकीत चांगलीच रंगत आली होती. जाहीर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी तर अनेक गावांमध्ये उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी रॅली काढून शक्तिप्रदर्शनाचे दर्शन घडविले.
दरम्यान, बुधवारी सायंकाळी जाहीर प्रचाराची मुदत संपली होती. शुक्रवारी मतदान असल्याने, उमेदवारांना व त्यांच्या समर्थकांना एक दिवसाचा अवधी मिळाला होता. त्यातच गुरुवारी मकरसंक्रांत हा वर्षातील पहिल्या सणाची पर्वणीच्या संधीचा सदुपयोग करून घेतला. अनेकांनी मतदारांच्या भेटीगाठी घेत छुप्या पद्धतीने प्रचार केला. मात्र यात आपल्याकडून कुठल्याही प्रकारचे निवडणूक नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेतली. दरम्यान ग्रामीण भागात निवडणुकीमुळे रात्री उशिरापर्यंत वर्दळ सुरू असल्याचे दिसून आले.