औषधांची जीएसटी रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 22:32 IST2019-11-12T22:31:50+5:302019-11-12T22:32:08+5:30
मागणी : वेैदकीय विक्री प्रतिनिधी संघटनेची मागणी

dhule
धुळे : वैद्यकीय विक्री प्रतिनिधी संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी ८ जानेवारीला एक दिवसाचा देशव्यापी संप केला जाणार आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली.
औषधांवरील जीएसटी रद्द करण्यासाठी केंद्रीय कामगार संघटना व एफएमआरएआय व इतर अखिल भारतीय कामगार संघटनातर्फे ८ जानेवारी संप पुकारण्यात आला आहे. औषधांवरील जीएसटी रद्द करावा, कामगार कायद्यात एकतर्फी बदल करू नये, कामगार कायद्याची सक्तीने अंमलबजावणी करण्यात यावी, सर्व कामगारांना सामाजिक सुरक्षा पुरविण्यात यावी, सरकारी कंपन्यांंचे खासगीकरण त्वरित थांबवावे आदी मागण्यासाठी हा संप पुकारण्यात आला आहे. शासनाने मागण्या मंजूर कराव्यात, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाव्दारे प्रशासनाला देण्यात आला आहे़
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निर्दशने करण्यात आले. यावेळी आंदोलनात विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेच्या धुळे शाखेचे अजय चौधरी, प्रशांत वाणी, सचिन पारोळेकर, योगेश माळी, अमोल निशाने, मनोज मराठे सहभागी झाले होते.