झिरो बॅलन्सने खाते उघडण्याची मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 13:21 IST2020-02-28T13:20:35+5:302020-02-28T13:21:03+5:30
वडजाई : स्टेट बँक आॅफ इंडीयाचा उपक्रम

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
वडजाई : धुळे तालुक्यातील वडजाई येथे स्टेट बँक आॅफ इंडिया पुष्पाजंली ब्रॅच धुळेच्या वतीने झिरो बॅलेन्समध्ये गावकऱ्यांचे बॅकेत खाते उघण्याची मोहिम हाती घेतली आहे. त्याला ग्रामस्थाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
त्यात वडजाई गावात एकूण १६० गावकऱ्यांनी बँकेत खाते उघडले आहे. त्यापैकी पन्नास नागरिकांना ’अटल पेन्शन’ं योजनेचा लाभ मिळणार आहे. तर ७० नागरिकांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी १८ ते ४० वयोगटातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मात्र खाते उघडल्यानंतर बँकेत व्यवहार केल्यावर दोन लाख रुपयांचा जीवनबीमा योजनेचा लाभ मिळणार आहे. जास्त जास्त गावकºयांनी खाते उघडून बँकेच्या सुविधांचा व बँकेत व्यवहार करून पत वाढवण्याचे आवाहन, मनोज जोशी, संजय जोशी, सिध्देश जोशी, रिध्देश जोशी, प्रतिक शर्मा यांनी केले आहे.