पांझरेचा पूर ओसरला, चार पुल मात्र वर्दळीसाठी बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 11:50 IST2019-08-06T11:50:22+5:302019-08-06T11:50:48+5:30
तीन पुलावरच भीस्त : पुराच्या पाण्यात मांजरीचा एक वाहून गेला

पांझरेचा पूर ओसरला, चार पुल मात्र वर्दळीसाठी बंदच
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : साक्री तालुक्यातील पश्चिम पट्यात झालेला मुसळधार पाऊस आणि या भागातील लहान-मोठी धरणे ओसंडल्यामुळे पांझरा नदीला पूर आला़ धुळ्यानजिक बायपासवरील पूल, शहरातील मोठा पूल आणि कुमारनगरातील पूल वगळता पांझरेवरील चारही पूल वाहतुकीसाठी बंदच करण्यात आले़ आता पश्चिम पट्यात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पांझरेला आलेल्या पुराचे प्रमाण तसे कमी झाले आहे़ पाणी मात्र वाहत असल्यामुळे सुरक्षितता म्हणून पांझरेवरील चारही पूल आजही वाहतुकीसाठी बंदच ठेवण्यात आलेले आहेत़ परिणामी अन्य तीन मोठ्या पुलावरील वर्दळ वाढलेली दिसत आहे़ बंद करण्यात आलेल्या पुलाची डागडुजी केली जाईल़ त्यानंतर पुल वापरण्यायोग्य आहेत का, याची चाचपणी केली जाईल़ परिणामी वर्दळ सुरु केली जाणार असून तुर्तास पूल बंदच आहे़
पांझरेत प्रौढ वाहून गेला
साक्री तालुक्यात आजच्या स्थितीतही पांझरा नदीतील पाण्याला ओढा प्रचंड प्रमाणात आहे़ साक्री तालुक्यातील मांजरी येथे राहणारे मुंग्या बुधा बिलकुळे (५६) हे सोमवारी रात्री पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले़ त्यात ते मृत झाल्याने त्यांचा मृतदेह शोधून पाण्याच्या बाहेर काढण्यात आला़ मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला़