रेल्वे विभागातील सी. झेड. शेवरे यांचा सेवापूर्ती कार्यक्रम उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:42 IST2021-09-07T04:42:51+5:302021-09-07T04:42:51+5:30

चिंधा शेवरे हे २ डिसेंबर १९८३ रोजी रेल्वे खात्यात आरपीएफमध्ये भरती झाले होते. त्यांनी १३ वर्षे सर्व्हिस केली. ...

C. Z. Shevare's service completion program is in full swing | रेल्वे विभागातील सी. झेड. शेवरे यांचा सेवापूर्ती कार्यक्रम उत्साहात

रेल्वे विभागातील सी. झेड. शेवरे यांचा सेवापूर्ती कार्यक्रम उत्साहात

चिंधा शेवरे हे २ डिसेंबर १९८३ रोजी रेल्वे खात्यात आरपीएफमध्ये भरती झाले होते. त्यांनी १३ वर्षे सर्व्हिस केली. त्यानंतर त्यांची जून १९९६ मध्ये टीसी या पदावर पदोन्नती झाली. या विभागात त्यांनी २५ वर्षं सर्व्हिस केली. असे एकूण ३८ वर्षं प्रदीर्घ सेवेनंतर ते नुकतेच सेवानिवृत्त झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष धुळे स्टेशन मास्टर एस. आर. जाधव, शिरुडचे स्टेशन मास्टर महाजन, धुळे येथील सी.आर.एस. ठाकूर, सायली पाठक, धुळे येथील सी.जी.एस. नगराळे, भुसावळ येथील चीफ तिकीट इन्स्पेक्टर राजेश पाटील तसेच शेवरे त्यांच्या पत्नी विमलबाई शेवरे यांच्यासह सर्व कुटुंबीय उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तामथरे येथील प्राथमिक शिक्षक लोटन कोळी यांनी केले. आभारप्रदर्शन योगेश बिराडे यांनी केले.

Web Title: C. Z. Shevare's service completion program is in full swing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.