आग्रा रोड भागामध्ये सर्वाधिक वर्दळ; वाहनांच्या गर्दीत पायी चालायचे कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:26 IST2021-07-18T04:26:00+5:302021-07-18T04:26:00+5:30
रोज हजारो लोकांची ये-जा शहरातील महात्मा गांधी पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत अनेकांची वर्दळ याच मार्गावर दिवसभर सुरू असते. ...

आग्रा रोड भागामध्ये सर्वाधिक वर्दळ; वाहनांच्या गर्दीत पायी चालायचे कसे?
रोज हजारो लोकांची ये-जा
शहरातील महात्मा गांधी पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत अनेकांची वर्दळ याच मार्गावर दिवसभर सुरू असते. परिणामी, या रस्त्यावर रोज किमान हजारो लोकांची ये-जा सुरू असते.
फुटपाथ कागदावरच
आग्रा रोडवर कोणत्याही प्रकारचा फुटपाथ नाही. जो काही असेल तो केवळ कागदावरच असेल, असे म्हणायला हरकत नाही. फुटपाथ असतो अशा ठिकाणी पथारीवाल्यांनी जागा बळकावून घेतली असल्याचे दिसून येते.
अतिक्रमण हटाव
केवळ दाखवायलाच
शहरातील वर्दळीच्या असलेल्या आग्रा रोडवर महापालिकेच्या माध्यमातून अतिक्रमण हटाव मोहीम पोलिसांची मदत घेऊन वेळोवेळी राबविली गेली आहे. पण, त्याचा फारसा काही उपयोग झालेला नाही. पुन्हा जैसे थेच आहे़
पायी चालायला भीती
कामानिमित्त आग्रा रोडवर आल्यानंतर पायी चालणेदेखील कधी कधी कठीण होते. वाहन चालविणे या मार्गावर शक्य नाही. गर्दी आणि अस्ताव्यस्तमुळे खूप त्रास होत आहे. पायी चालणाऱ्यांसाठी रस्ता मोकळा हवा.
- कामिनी पाटील, धुळे
पायी चालायचे कसे?
आग्रा रोडवर रोज नाही पण वेळोवेळी यावे लागते. वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे पायी चालायचे कसे, हा प्रश्न असून तो अनुत्तरित आहे. वाढणारे अतिक्रमण काढल्यास पायी चालणे शक्य होईल.
- प्रीती जोशी, धुळे
वेळोवेळी राबविली मोहीम
शहरातील आग्रा रोडवर यापूर्वी वेळोवेळी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली आहे. लोटगाडीधारकांनादेखील हटविले आहे. हजारो रुपयांचा दंड वसूल केला असून, वेळोवेळी ही मोहीम प्रशासनाच्या माध्यमातून राबविली जात असते. कोणीही अतिक्रमण करून रस्ता अडवू नये.
- प्रसाद जाधव, महापालिका, धुळे