बस-ट्रकचा अपघात जीवितहानी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 10:18 PM2019-10-17T22:18:00+5:302019-10-17T22:18:44+5:30

बाभळे फाटा : तीन जणांना दुखापत

Bus-truck accident survives | बस-ट्रकचा अपघात जीवितहानी टळली

बस-ट्रकचा अपघात जीवितहानी टळली

Next

सोनगीर : मुंबई-आग्रा महामार्गावर बाभळे औद्योगिक वसाहती जवळ धुळे येथील पोद्दार इंटरनॅशनल शाळेच्या विद्यार्थ्यांना ने - आण करणाºया  शाळेच्या बसला गुरुवारी सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास  अपघात झाला. सुदेवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही़
नेहमी प्रमाणे गुरुवारी सकाळी धुळे येथील पोद्दार स्कूलची  एमएच ४३ एच ३०८४ क्रमांकाची बस सोनगीर व परिसरातील विद्यार्थ्यांना घ्यायला आली़ यावेळी बाभळे येथून एक विद्यार्थी घेऊन बस सोनगीरकडे येत असतांना शिंदखेडा तालुक्यातील बाभळे येथील औद्योगिक वसाहतीच्या समोर महामार्गावर  बसच्या पुढे चालत असलेल्या मालट्रक ने अचानक ब्रेक मारला़ बस ही मालट्रकला मागून ठोकल्या गेली़ याप्रसंगी सुदैवाने बसमध्ये विद्यार्थ्यांची फारशी संख्या नव्हती़ मात्र विद्यार्थीसाठी मदतनीस म्हणून असलेल्या दोन महिला कर्मचारी व चालक यास दुखापत झाली़
चालक मदनलाल नारायण गुजर (५२) बस मध्ये मदतनीस म्हणून असलेल्या गीता दिनेश सोनार (३९), भारती ईश्वर माळी (२९) रा. सोनगीर हे तिघे जखमी झाले आहेत़ विद्यार्थी वंश मनोहर रुपनर, प्रेरणा प्रफुल्ल कासार हे दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत़ परंतु अपघाताने विद्यार्थी पूर्णपणे भयभीत झाले होते. जखमींना तात्काळ सोनगीर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांचेवर प्राथमिक उपचार करुन चालक व मदतनीस यांना धुळे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले़ त्यांच्यावर उपचार सुरु आहेत़ 

Web Title: Bus-truck accident survives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.