धुळे : दोंडाईचा येथील शिवाजी नगरात असलेले बंद घर फोडून चोरट्याने दागिन्यांसह रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आलेली आहे़ याप्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले़ दोंडाईचा येथील उर्दू हायस्कूल समोर असलेल्या शिवाजी नगरात राहणारे शिवाजी नागो धनगर (४९) यांचा मजुरी हा व्यवसाय आहे़ ते सप्तश्रृंगी गडासह शिर्डी येथे देवदर्शनासाठी गेले होते़ बाहेरगावी गेल्यामुळे त्यांचे घर ९ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेचार ते १० नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बंद होते़ त्याचाच फायदा चोरट्यांनी उचलला़ घराला लावलेले कुलूप तोडून घरात प्रवेश करीत संसारोपयोगी साहित्याचे नुकसान केले़ शोधाशोध सुरु करुन स्वयंपाकगृहात ठेवण्यात आलेले गोदरेजचे कपाट देखील चोरट्याने फोडले़ त्यात ठेवलेली १० हजाराच्या रोख रकमेसह दागिने चोरट्याने लांबविले़ धनगर परिवार घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले़
दोंडाईच्यात घरफोडी दागिने, रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 22:01 IST